India vs South Africa 1st ODI : भारताने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजीचा निर्णय | पुढारी

India vs South Africa 1st ODI : भारताने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्‍यातील तीन सामन्‍यांच्‍या वन डे मालिकेतील पहिला सामना लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

लखनौमध्‍ये पावसाची शक्‍यता असल्‍याने सामना उशीरा सुरु होईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय ) म्‍हटलं होते. पावसामुळे सामना सुरु होण्‍यास विलंब झाला आहे. त्‍यामुळे हा सामना आता ४० षटकांचा होणार आहे. पहिला एक गोलंदाज जास्‍तीत जास्‍त आठ षटके टाकू शकेल. पहिला पॉवर प्‍ले हा १ ते आठ षटकांचा असेल, दुसरा पॉवर प्‍ले ९ ते ३२ तर तिसरा पॉवर प्‍ले ३३ ते ४० षटकांचा असेल.

सामन्‍यापूर्वी दोन्‍ही संघांनी सराव केला आहे. Accuweather नुसार लखनौमध्‍ये गुरुवारी ढगाळ वातावरण असणार आहे. संपूर्ण दिवसभरात पावसाची शक्‍यता ९६ टक्‍के आहे. दिवसभर पावसाची उघडझाप सुरुच राहिल. लखनोमधील कमाल तापमान ३० तर किमान २५ डिग्री सेल्सियस राहणार आहे. दिवसभर ९४ टक्‍के ढगाळ वातावरण असेल.

टीम इंडियाचा यंग ब्रिगेड सज्‍ज

ऑस्‍ट्रेलियात होणार्‍या टी-२० विश्‍वचषक स्‍पर्धेसाठी टीम इंडिया रवाना झाल्‍याने या मालिकेत भारताचे स्‍टार क्रिकेटपटू असणार नाहीत क्षिण आफ्रिकेविरुद्‍धच्‍या वन डे मालिकेसाठी शिखर धवन याच्‍या नेतृत्त्‍वाखाली टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. या मालिकेत संजू सॅमसनसह शुभमन गिलच्‍या कामगिरीवरही सर्वांचे लक्ष असणार आहे.. शिखर धवन याच्‍या नेतृत्‍वाखालील संघाने यापूर्वी वेस्‍ट इंडिजविरुद्‍धची मालिका जिंकली आहे.

 

 

Back to top button