बॉलिवूडच्या या पॉवर कपलच्या डिव्होर्सच्या चर्चेदरम्यान घडलं असं काही की...

पुढारी ऑनलाईन डेस्क : दीपिका- रणवीर, दीप – वीर अशा अनेक निकनेम्सनी ओळखलं जाणारं बॉलिवूडच हे पॉवर कपल वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. या कपलच्या डिव्होर्सच्या चर्चांनी बी टाऊन मध्ये चांगलाच जोर धरला आहे. हा सगळा सिलसिला सुरू झाला ते एका ट्वीटमुळे रणवीर- दीपिकाच्या मध्ये सगळं काही ठीक नसल्याचं हे ट्वीट व्हायरल झालं आणि खळबळ उडाली. लग्नाला केवळ चार वर्षं झाली असताना या जोडीचं वेगळं होणं चाहत्यांसाठीही धक्का होता. पण या अफवांना मागे सारत या जोडीने चाहत्यांसामोर प्रेमाची कबुली देत या अफवाच असल्याच सिद्ध केलं आहे.
View this post on Instagram
या मुद्द्यावर या दोघांनीही थेट प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. पण त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून मात्र त्यांचं बॉंडिंग घट्ट असल्याचं समोर आलं आहे. रणवीरने अलीकडेच एक फोटो केला आहे. यात दीपिकाच्या एका अॅड समोर तो उभा आहे. दीपिकाच्या कान्सवेळी काढलेल्या या फोटोत तो तिच्याविषयीच प्रेम व्यक्त करताना दिसतो आहे. तर दीपिकानेही रणवीरच्या पोस्टवर रोमॅंटिक कमेंट करत या जोडीमधील केमिस्ट्री घट्ट असल्याचं जाणवून दिलं आहे. एकंदरीत या जोडीच्या एकमेकांवरील प्रेम सोशल मिडियावर व्यक्त करण्याने चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
इटलीमधील लेक कोमो या ठिकाणी 2018 मध्ये ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकली होती. कोंकणी आणि सिंधी विधी पार पाडत ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकली होती. लग्नानंतर ही जोडी 83 या सिनेमात एकत्र दिसली होती. आताही चाहते या जोडीला पडद्यावर एकत्र पाहण्याची इच्छा बाळगून असतील यात शंका नाही.