खोकल्याच्या औषधाने आफ्रिकेत ६६ मुले दगावली – भारतीय कंपनीची चौकशी सुरू | पुढारी

खोकल्याच्या औषधाने आफ्रिकेत ६६ मुले दगावली - भारतीय कंपनीची चौकशी सुरू

खोकल्याच्या औषधाने आफ्रिकेत ६६ मुले दगावली - भारतीय कंपनीची चौकशी सुरू

पुढारी ऑनलाईन : एका भारतीय कंपनीचे खोकल्याचे औषध पिऊन आफ्रिकेलीत गांबिया देशात ६६ बालकांचा मृत्यू झाल्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO – World Health Organization) दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या कंपनीच्या ४ औषधाबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे. या संदर्भाती जागतिक आरोग्य संघटना आणि भारतातील Central Drugs Standard Control Organisationने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून यावर पुढील तपास सुरू आहे. (Contaminated cough syrups)

हरियाणातील Maiden Pharmaceuticals Limited या कंपनीने बनवलेली औषधे सध्या संशयाच्या भोवऱ्यात आहेत. Promethazine Oral Solution, Kofexmalin Baby Cough Syrup, Makoff Baby Cough Syrup आणि Magrip N Cold Syrup ही चार खोकल्याची औषधे ही लहान मुलांच्या आजारात वापरली जातात. ही औषधे भेसळयुक्त आहेत, तसेच त्यात असणारी काही रसायनं ही जीवघेणी ठरू शकतात, असा संशय जागतिक आरोग्य संघटनेला आहे.

या औषधांत diethylene glycol आणि ethylene glycol ही रसायने प्रमाणापेक्षा जास्त आढळली आहेत. ही रसायने जीवघेणी असतात.
२९ सप्टेंबरला जागतिक आरोग्य संघटनेने, Drugs Controller General of India आणि National Drug Regulator of India पत्र लिहिले होते. यामध्ये गांबियामध्ये जे मुलांचे मृत्यू झाले आहे, त्याचे कारण Diethylene glycol किंवा Ethylene glycol यामुळे झाल्याचे म्हटले होते. गांबियात जुलैमध्ये मुलांत किडनीची समस्या निर्माण होत असल्याचे निदर्शनाला आले होते, त्यानंतर गांबियाने जागतिक आरोग्य संघटनेकडे तक्रार नोंदवली होती. स्थानिक बाजारातील काही खोकल्याची औषधे घेतल्यानंतर मुलांची प्रकृती बिघडत असल्याचे दिसून आले होते.

हेही वाचा

Back to top button