मंकीफॉक्स कोराेनासारखा पसरणार नाही, तो नियंत्रणात येईल : WHO | पुढारी

मंकीफॉक्स कोराेनासारखा पसरणार नाही, तो नियंत्रणात येईल : WHO

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

कोरोनाची जागतिक साथ अजून संपलेली नसतानाच काही देशांत मंकीफॉक्स या आजाराचे रुग्ण दिसू लागले आहेत; पण जागतिक आरोग्य संघटनेने मंकीफॉक्सची साथ नियंत्रणात येण्यासारखी असल्याचे म्हटले आहे, एक प्रकारे हा दिलासाच म्हटला जात आहे. आफ्रिकेच्या बाहेर जिथे हा व्हायरस सहसा दिसत नाही, तिथे ही मंकीफॉक्स आटोक्यात येण्यासारखा आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO )  दिली आहे.

777 Charlie : केजीएफनंतर 777 चार्ली, बॉलिवूडसाठी मोठा धक्का?

रुग्णांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे; पण एकूण लोकसंख्येच्या दृष्टीने या आजाराचा धोका फार कमी आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. मंकीफॉक्सचा व्हायरस हा मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील दुर्गम भागात जास्त प्रमाणात आढळतो.

परिस्थिती नियंत्रणात येण्यासारखी आहे : WHO

जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्याने उद्रभवणाऱ्या आजार विभागाच्या प्रमुख मारिया वॅन केरकोव्ह यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली होती. “ही परिस्थिती नियंत्रणात येण्यासारखी आहे,” असे त्या म्हणाल्या. “माणसातून माणसाला मंकीफॉक्सची जी लागण होत आहे, ती आपल्याला नियंत्रणात आणावी लागेल. हे करता येणे शक्य आहे,” असे त्या म्हणाल्या.

आफ्रिकेच्या बाहेर १६ देशांत मंकीफॉक्सचे रुग्ण दिसले आहेत. आफ्रिकेबाहेर मंकीफॉक्स आजाराचा गेल्या ५० वर्षांतील पहिलीच मोठी साथ आहे; पण असे जरी असले तरी मंकीफॉक्सचा आजार सहजासहजी पसरत नसल्याने, याची तुलना कोरोनाशी करता येणार नाही, असेही तज्ज्ञ स्‍पष्‍ट करत आहेत.. “स्कीन टू स्कीन संपर्कातून मंकीफॉक्सचा फैलाव होत आहे, तसेच ज्यांना हा आजार झाला आहे, त्याच्यातील लक्षणं ही मध्यम ते सौम्य स्वरूपाची आहेत,” असेही त्‍यांनी सांगितले.

 

 

 

 

Back to top button