फलटण: बशा बैल उठल्यावर काय करतो माहिती आहे ना? | पुढारी

फलटण: बशा बैल उठल्यावर काय करतो माहिती आहे ना?

फलटण : पुढारी वृत्तसेवा :  कॉरीडॉर म्हणजे काय? हे ज्यांना माहित नाही, त्यांनी माझ्या नावाने बोंबलण्यापेक्षा खरोखरच मोठे प्रकल्प उद्योग आपल्या भागात आणण्यासाठी प्रयत्न करावेत. माझ्यावर टिकाटिप्पणी करणार्‍या भाजप जिल्हाध्यक्ष व खासदार या मोकाट सुटलेल्या जनावरांना थारा देऊ नका. बशा बैल उठल्यावर काय करतो हे सर्वाना माहीती आहे. माझ्यावर बोललात एकदा माफ केले, पुन्हा सुट्टी देणार नाही. गुंडगिरीची भाषा सहन करणार नाही. त्याच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशाराविधानपरिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या फलटण येथील संपर्क मेळाव्यात आ. रामराजे बोलत होते. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुनील माने, जेष्ठ नेते सुभाष शिंदे, सुभद्राराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर, शिवरूपराजे खर्डेकर – निंबाळकर, युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, विश्वजितराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते.

आ. रामराजे म्हणाले की ,सातारा जिल्ह्याला एक सुसंस्कृत अशी परंपरा  आहे. परंतु आता सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून गुंड प्रवृत्ती कार्यरत आहेत. एकेकाळी पृथ्वीराज चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू असे समजले जाणार्‍या ह्या दोघांनी त्यांचा विश्वासघात केला. ह्यांच्या पेक्षा ह्यांचे वडील हिंदुराव नाईक निंबाळकर परवडले, परंतु हे नाही. आता हे म्हणत आहेत कि रामराजेंच्या पाठीमागे आता ईडी लावू , पण ह्या नेत्यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे कि तुमच्याकडे ईडी आहे तर माझ्याकडे सीडी आहे. आणि तेसुद्धा फक्त एक सीडी नसून अश्या अनेक सीडीज माझ्याकडे आहेत. मुळची भाजपा आता जिल्ह्यात राहिली नाही.

काँग्रेसमध्ये असतानाआनंदराव पाटील यांना बाहेर काढण्याचे काम ह्या दोघांनी केले. हे माढ्यातून खासदार झाले ते फक्त विजयसिंह मोहिते – पाटील यांच्यामुळेच झाले. शंभरच्या वर यांचे कार्यकर्ते असतील असं कुणालाही वाटत नाही.कार्यकर्त्यांच्या नावावर कर्ज घेवुन त्याकार्यकर्त्याला आपल्याकडे ठेवण्याचेकाम खासदारकरत असतात, असाआरोपही आ. रामराजे यांनी केला. उपळवे येथील कारखान्यात एकही एमडी टिकत नाही. ह्या खासदारांच्या वडिलांना म्हणजेच हिंदुराव यांना नागपुरला अ‍ॅटॅक आला होता. त्यावेळी मी व आ. दीपकचव्हाण यांनी सांभाळलं. त्यावेळीजवळपास पाच दिवसांनी हे तिथे आलेहोते. तुमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येतहे बसतं का? खरंच तुम्ही श्रावणबाळ आहात का? असा प्रश्नही आ.रामराजे यांनीउपस्थित केला. सध्याभारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्षकोळकीचे आहेत, आता त्यांच्याकडेबघायचं आहे, असेही ते म्हणाले.

खा.श्रीनिवास पाटील म्हणाले,स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्यांनी सर्व खजिना हा सरकारला देवून जनहित पाहिले त्या मालोजीराजेंचा नातु आ. रामराजे आज या फलटणचं नेतृत्व करत आहेत. त्याच्या पाठीशी फलटणकरउभे आहेत. आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, फलटण तालुक्यात रामराजेंच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतपासुन ते विधानसभेपर्यंत सर्व ठिकाणी सत्ता राष्ट्रवादीचीच आहे. धोम बलकवडी व निरा उजवा कॅनोलच्या माध्यमातून फलटण तालुका हा बागायती करण्याचे काम रामराजेंनी केले. आपल्याला आपले पक्ष संघटन वाढवणे गरजेचे आहे. जनतेत या सरकारच्या विरोधात भावना आहे, म्हणूनच निवडणुका पुढे ढकलण्याचे काम हे सरकार करत आहे. आ. शशिकांत शिंदे म्हणाले, सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे व तो बालेकिल्लाच राहणार. रामराजेंचा अंत व अंदाज आम्हाला सुध्दा आला नाही.

रामराजे सभापती असताना आमचं फिक्सिंग असायचं. आता पुढच्या काळामध्ये रामराजेच सभापती होणार आहेत. आपण सर्वजण एकजुटीने काम करून राष्ट्रवादीची सत्ता राज्यावर आणणे गरजेचे आहे. विचारांची लढाई विचाराने करणे गरजेची आहे. नुकतेच उदयनराजेंनी रामराजेंच्या बाजुचीच भुमिका घेतली. त्यांनी स्पष्ट केले कि म्हसवड येथे व कोरेगाव येथे दोन्हीकडे एमआयडीसी होऊद्यात, हेच रामराजेंचे मत आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष गोरे यांची रामराजेंच्यावर बोलण्याचीलायकी नाही. पवार साहेबांच्यामाध्यमातुन रामराजेंनी फक्त फलटण नव्हे तर माण तालुक्यातील जिहे कठापुरसह इतर कामांची पायाभरणीचे काम केल्याचे आ. दिपक चव्हाण म्हणाले. संजीवराजे ना. निंबाळकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

जिल्हाध्यक्ष-खासदारांचे नाते वटसावित्रीचे

चिमणराव कदम यांचे व माझे, कृष्णचंद्र भोईटे यांच्यासोबत संघर्ष झाले. परंतु बाहेरचे कोणीही तालुक्यात आणले नाहीत. आता अलीकडच्या काळामध्ये सातारा जिल्हा असो किंवा यांचा मतदारसंघ असो जर गोरेच सगळं करत असतात तर खासदार गोरेंची बॅग घेवुन फिरतात का? भाजप जिल्हाध्यक्ष व खासदारांचे नाते वटसावित्रीसारखे आहे, असा टोलाही यावेळी आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी लगावला.

 

Back to top button