पुणे : आयातीमुळे खाद्यतेले गडगडली; डाळी, साबुदाण्यातील मंदी कायम | पुढारी

पुणे : आयातीमुळे खाद्यतेले गडगडली; डाळी, साबुदाण्यातील मंदी कायम

पुणे : आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी, मुबलक पुरवठा आणि तोंडावर आलेला नवा हंगाम यामुळे खाद्यतेलांमधील घसरण सुरूच आहे. खाद्यतेलांंमधील घसरणीचे सत्र गेल्या आठवड्यातही सुरूच होते. शेंगदाणा तेल वगळता अन्य सर्व खाद्यतेलांच्या दरात आणखी मोठी घट झाल्याचे सांगण्यात आले. नवरात्रोत्सवाची मागणी संपल्यानंतर साबुदाण्याच्या दरात क्विंटलमागे 500 ते 600 रुपयांनी घट झाली. मागणी कमी असल्यामुळे डाळींचे दर आणखी उतरल्याचे सांगण्यात आले. आगामी दिवाळीच्या खरेदीसाठी 2 ऑक्टोबर पासून यापुढे दर रविवारीही बाजारपेठा चालू राहणार आहेत. मात्र, अद्यापपर्यंत बाजारातील उलाढाल मंदावलेलीच असल्याचे सांगण्यात आले.

मुबलक पुरवठा आणि मंदावलेली मागणी यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलांच्या दरात मोठी घसरण झाली असून दर नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. गेल्या आठवड्यातही सोयाबीन, सूर्यफूल तसेच पामतेलाच्या दरात टनामागे 75 ते 100 डॉलर्सनी घट झाल्याचे वृत्त आहे. दसरा- दिवाळी हे सण असले तरी घाऊक बाजारात अद्यापही खाद्यतेलास अपेक्षित प्रमाणात मागणी नाही. भाव सातत्याने घसरत असल्यामुळे जरुरीप्रमाणेच खेरदी करण्याकडे व्यापार्‍यांचा कल आहे.

गेल्या आठवड्यातही शेंगदाणा तेल वगळता अन्य सर्व खाद्यतेल तसेच वनस्पती तुपाच्या दरात 15 किलो/लिटरच्या डब्यामागे आणखी 50 ते 60 रुपयांनी घट झाली. सर्वाधिक घट पामतेलाच्या दरात झाली असून 15 किलोच्या डब्याचे दर 1 हजार 450 ते 1 हजार 550 रुपयांपर्यंत घसरले आहेत. देशातील काही भागात भुईमूग शेंगांची तुरळक प्रमाणात आवक सुरू झाली असून पावसामुळे ओलसरपणा अधिक आहे. यामुळे येत्या 15 दिवसांनतर आवक सुरू होईल, त्यांनतर शेंगदाणा तेलाचे दरही कमी होतील, असा अंदाज आहे.

साखरेचा कोटा जाहीर
केंद्र सरकारने ऑक्टोबर महिन्यासाठी 23.5 लाख टनांचा साखरेचा कोटा जाहीर केला आहे. या महिन्यातील दसरा आणि दिवाळी हे महत्त्वाचे सण असल्यामुळे हा कोटा पुरेसा नाही, या भावनेने कोट्याच्या घोषणेनंतर दरात काही प्रमाणात वाढ झाली होती. तथापि, ही तेजी तात्कालिक ठरेल. कारण 22 तारखेनंतर दिवाळीमुळे साखरेला उठाव राहणार नाही. यामुळे हा कोटा पुरेसा आहे, असे मत एका ज्येष्ठ व्यापार्‍याने व्यक्त केले. शनिवारी येथील घाऊक बाजारात एस 30 साखरेचा प्रती क्विंटलचा दर 3625 ते 3650 रुपये होता. आवक जावक साधारण असल्यामुळे गुळाच्या दरात फारशी वाढ घट आढळली नाही.

मटकी आणखी घसरली, अन्य डाळीही मंदीत
राजस्थानकडील नव्या मटकीची आवक सुरू झाल्यामळे राजस्थान, गुजरात तसेच पॉलिश मटकी दरातील घसरण सुरूच आहे. गेल्या आठवड्यातही मटकी दरात क्विंटलमागे 200 ते 300 रुपयांनी घट झाली. मात्र, गावरान तसेच सेलम मटकीचे दर टिकून होते. पावसामुळे खराब झालेल्या मुगाची आवक होत असून चांगल्या मालाचा तुटवडा आहे. यामुळे अद्यापही दर कमी झालेले नाहीत. मागणी कमी असल्यामुळे हरभराडाळ, मसूरडाळ, मटकीडाळ तसेच उडीदडाळीचे दर आणखी कमी झाल्याचे सांगण्यात आले.

पुण्याच्या घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे : साखर (प्रतिक्विंटल) :3625-3650 रु. खाद्यतेले (15 किलो/लिटर) : शेंगदाणा तेल 2750-2800, रिफाइंड तेलः 2400-3150, सरकी तेल 1850-2200, सोयाबीन तेल 1700-1900, पामतेल 1450-1550, सूर्यफूल रिफाइंड तेल 1950-2200, वनस्पती तूप 1400-2000, खोबरेल तेल 2100 रु.

तांदूळ : गुजरात उकडा 3800-4000, मसुरी 3200-3500, सोनामसुरी 4000-4500, एच.एम.टी. कोलम 4700-5000, लचकारी कोलम 5500-6500, चिन्नोर 4000-4500, 1121-1100-12000, आंबेमोहोर (सुवासिक) 8000-8500, बासमती अखंड 11000-11500, बासमती दुबार 8500-9000, बासमती तिबार 9500-10000, बासमती मोगरा 4500-5500, बासमती कणी 3500-3700, 1509-8000-8500 इंद्रायणी 4500-5000 रु. गहू : सौराष्ट्र लोकवन नं. 1 3500-3800, सौराष्ट्र लोकवन नं. 2 3200-3400, एम.पी. लोकवन 2900-3600, सिहोर नं. 1 4800-5500, सिहोर नं. 2 4200-4500, सिहोरी 3200-3600, मिलबर 2750-2800 रु. ज्वारी : गावरान नं. 1-4200-4500, गावरान नं. 2-3400-3800, नं. 3 3000-3200, दुरी 3200-3200 रु. बाजरी : महिको 3000-3200, गावरान 2700-2800, हायब्रीड 2600 रु. गूळ : गूळ एकस्ट्रा 4000-4100, गूळ नं.1 3800-3900, गूळ नं. 2 3650-3750, गूळ नं.3 3500-3600, बॉक्स पॅकिंग 3700-4700 रु.

डाळी : तूरडाळ 10000-11200, हरभराडाळ 5600-5800, मूगडाळ 8000-9000, मसूरडाळ 7500-7700, मटकीडाळ 10000-10500, उडीदडाळ 8500-10500 रु. कडधान्ये : हरभरा 5500-5600, हुलगा- 7200-7500 चवळी 7000-8000, मसूर 7000-7100, मूग 7000-8000, मटकी गावरान 10500-115000, मटकी पॉलिश 7000-7500, मटकी गुजरात 7000-7500, मटकी राजस्थान 7000-7500, मटकी सेलम 13000-13500, वाटाणा हिरवा 5000-6000, वाटाणा पांढरा 6700-6800, काबुली चणा 9000-11500 रु. साबूदाणा : साबूदाणा नं.1 7000, साबूदाणा नं.2 6800, साबूदाणा नं.3 6500 रु. वरई भगर :11000-12000, सावा भगर 10000-11000, गोटा खोबरे 1600-1800 रु. शेंगदाणा : जाडा 11000, स्पॅनिश – 11500, घुंगरु 10800-11000, टीजे 10500-10600 रु. धने : गावरान 12000-13000, इंदूर 14000-17000 रु. मका लाल : 2350-2400, पिवळा 2250-2300, पांढरा 2500-2550 रु.

पोहे : मध्य प्रदेश 4000-4300, पेण 3800-4100, मध्यम पोहा-3800-4200, दगडी पोहा 4000-4800, पातळ पोहा 4600-5300, सुपर पोहा 4400-4800, भाजका पोहा 600-650, मका पोहा 625-675, भाजके डाळे 2750-3400, मुरमुरा (9 किलोस) 475-525, भडंग 650-775, घोटी 450-475, सुरती 475-500 रु.रवा, मैदा, आटा : (50 किलोचा भाव) आटा 1500-1550, रवा 1600-1650, मैदा 1600-1650 रु. बेसन : (50 किलोस) 3300-3600 रु. मीठ : मीठ खडे (50 किलोस) 230, मीठ दळलेले (50 किलोस) 260 रु. मिरची : काश्मिरी ढब्बी 45000-47000, ब्याडगी 35000-37000, लवंगी तेजा 23000-25000, गुंटूर 25000-27000, खुडवा गंटूर 5500-6000, खुडवा ब्याडगी 4000- 4500 रु. नारळ : (शेकड्याचा भाव): नवा नारळ पॅकिंग 1350-1400, मद्रास 2500-2600, पालकोल जुना 1500-1550, सापसोल 2000-2700 रु.

Back to top button