Bigg Boss Marathi 4 : माणूस हाय मी; बिग बॉस मराठीचे स्पर्धक किरण मानेंची पोस्ट व्हायरल
पुढारी ऑनलाईन डेस्क : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीचे स्पर्धक अभिनेते किरण माने (Bigg Boss Marathi 4) यांची एंट्री झाली आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. ती पोस्ट व्हायरल होत आहे. वाचा ही सविस्तर पोस्ट त्यांच्याच शब्दांत…
माझा इस्वास हाय तुमी माझी साथ सोडनार नाय! मानूस हाय मी, माणसासारखा वागनार तिथं. मनापास्नं. कुठलंच ढोंग नाय करनार. खेळ हाय त्यो. स्विकारलाय तर जीव लावून खेळनार. ढिला पडनार नाय. हसनार, हसवनार, चिडनार, चिडवनार, भांडनार, वाद घालनार, मैत्री केलीच तर ‘दिल से’ करनार…ती निभावनार. एखाद्यानं पंगा घेतला तर त्याला त्याची जागा दाखवायला कमी नाय पडनार….
Bigg Boss Marathi 4 : लै शिवराळ हाय
Bigg Boss Marathi 4 : तुकोबा माझ्या श्वासात
समस्त बहुजनांचा एक प्रतिनिधी
ही पोस्ट वाचताना तुमाला वाटत आसंल मी तर ‘बिग बाॅस’च्या घरात हाय. ही पोस्ट कधी लिहिली? भावांनो, जायच्या आधी मी हे लिहून ठेवलंय. आता माझं फेसबुक आनि इन्स्टा अकाऊंट माझ्या अत्यंत जवळच्या लोकांकडं आसंल. इथून पुढं माझ्या वतीनं ते पोस्टच्या माध्यमातनं तुमच्या संपर्कात रहातील. तुम्हीही काॅमेन्टस् करून वरचेवर तुमचं मत कळवत रहा. मी तिथुन आल्यावर प्रत्येक काॅमेन्ट वाचेन हा शब्द देतो. ट्राॅफी घेऊन यायची इच्छा हाय. जिंकायची लै इच्छा हाय. अर्थात, तुमच्या व्होटिंगवर ते ठरंल. मी कधीच प्रेक्षकांना ‘गृहित’ धरत नाय. त्यामुळं मी किती दिवस राहिन, ते आत्ता तरी म्हाईत नाय. पन जेवढे दिवस राहीन तेवढे दिवस तुमची साथ, तुमचं प्रेम माझ्यासोबत राहूद्यात. आता मी एकटा नाय, समस्त बहुजनांचा एक प्रतिनिधी हाय. कायबी झालं तरी माझ्यावर माया करनार्या मातीचं मी लेकरू हाय. याची जानीव सतत मनात आसंल ही खात्री बाळगा.
जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम !
– किरण माने.
‘मुलगी झाली हो’ – विलास पाटिल
स्टार प्रवाहावरील अल्पावधीचं लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेली मालिका म्हणजे ‘मुलगी झाली हो’ (Mulagi Zali Ho). या मालिकेत ते माउचे बाबा म्हणजे विलास पाटिल यांची भूमिका साकारत होते. या मालिकेमधील बाप-मुलीचं अनोख नातं असणार्या त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडलेली. गावराण, रांगड्या आणि साधा सरळ, मनाचा ठाव घेणारा विलास पाटिल प्रेक्षकांना आपला वाटतो. पण त्यांना या मालिकेतून त्यांना बाहेर काढण्यात आले. त्यावेळी ते चर्चेत आले होते.