Mahesh Manjarekar : बिग बॉस मराठीचं चौथ पर्व, महेश मांजरेकर करणार सूत्रसंचालन | पुढारी

Mahesh Manjarekar : बिग बॉस मराठीचं चौथ पर्व, महेश मांजरेकर करणार सूत्रसंचालन

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठीचं चौथ पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येणार हे समजल्यानंतर सर्वांचीच उत्सुकता वाढली होती. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोण कोण असणार आणि मुख्य म्हणजे त्याचा सूत्रधार कोण असणार याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्या प्रश्नाचं उत्तर आता प्रेक्षकांना मिळालं आहे. केवळ मराठीच नाही तर हिंदीमध्येही आपल्या कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने आणि अभिनयाने वेगळी छाप सोडणारे मराठी माणसांना कायम आपलेसे वाटणारे महेश मांजरेकर या कार्यक्रमाच्या सूत्रधाराच्या भूमिकेत दिसणार आहेत.

बिग बॉस मराठीचा सीझन नवा, घर नवे, खेळाडू देखील नवे… पण, होस्ट मात्र तोच, महेश वामन मांजरेकर ! लवकरच येणार नव्या कोऱ्या पर्वासोबत तुमच्या भेटीला … असा प्रोमो काल आला आणि सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली. बिग बॉस मराठीच्या तिन्हीही पर्वांच्या अभूतपूर्व यशानंतर कलर्स मराठी आता घेऊन येत आहे.

बिग बॉस मराठी कार्यक्रमाचा सीझन चौथा. मागील पर्वामध्ये सूत्रसंचालनाच्या अनोख्या स्टाईलने महेश मांजरेकर यांनी प्रेक्षक आणि सदस्य सगळ्यांचीच मने जिंकली. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये ते सांगताना दिसले, बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये मी घेणार आहे “वेगळी” शाळा! आता नक्की काय घडणार? कशी घेणार महेश मांजरेकर स्पर्धकांची शाळा? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

 

 

Back to top button