आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा नक्षलवादी बनवा; शेतकऱ्यांनी केली विरोधीपक्षनेत्यांकडे मागणी | पुढारी

आम्हाला न्याय द्यावा, अन्यथा नक्षलवादी बनवा; शेतकऱ्यांनी केली विरोधीपक्षनेत्यांकडे मागणी

गोरेगाव, पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील अतिवृष्टीच्या अनुदानात शेतकरी वंचित राहिल्यामुळे गेल्या १६ सप्टेंबर पासून अपर तहसीलदार कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. संपाचा अकरा दिवस उलटून सुध्दा सत्ताधारी सरकारच्या धोरणामुळे याकडे दुर्लक्ष केले असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी विरोधीपक्ष नेते अजित पवार यांना पत्र देऊन आम्हाला न्याय द्यावा. अन्यथा नक्षलवादी बनवा, असे पत्र तहसीलदार व पोलीस प्रशासनाच्या मार्फत पाठविले असल्याने गावात खळबळ उडाली आहे. या पत्रावर शेकडो शेतकऱ्यांनी सह्या केल्या आहेत.

गोरेगाव, बाभुळगाव, आजेगाव, पुसेगाव हे चार सर्कल तीन महसुल मंडळ अतिवृष्टीच्या अनुदानातुन डावलल्याने वंचित शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात (दि १६ सप्टेंबर) पासून गोरेगावात अपर तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत संप पुकारला आहे. या संपाची आस तालुक्यातील अनेक गावात पोहचली असून ठिकठिकाणी आंदोलनाची ठिणगी पेटली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button