बाळासाहेब ठाकरे यांचे सहायक चंपासिंह थापा, मोरेश्वर राजे यांचा शिंदे गटात प्रवेश | पुढारी

बाळासाहेब ठाकरे यांचे सहायक चंपासिंह थापा, मोरेश्वर राजे यांचा शिंदे गटात प्रवेश

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सावली समजले जाणारे चंपासिंह थापा आणि मातोश्रीवर प्रदीर्घ काळ सेवा बजावलेले मोरेश्वर राजे यांनी आज (दि.२६) एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. टेंभी नाक्यावरील अंबे मातेच्या आगमन मिरवणुकीत देवीच्या साक्षीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्या दोघांनी प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मार्गक्रमण करणाऱ्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय त्यांनी यावेळी जाहीर केला.

बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार जी व्यक्ती पुढे घेऊन जात आहे, अशा व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे यावेळी या दोघांनी सांगितले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, ठाणे जिल्हाप्रमुख व शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, युवासेना विस्तारक राहुल लोंढे आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button