Monkeypox in China : मंकीपॉक्‍सचा रुग्‍ण आढळल्‍यानंतर चीनच्‍या ‘त्‍या’ आदेशामुळे नवा वाद | पुढारी

Monkeypox in China : मंकीपॉक्‍सचा रुग्‍ण आढळल्‍यानंतर चीनच्‍या 'त्‍या' आदेशामुळे नवा वाद

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट लादणार्‍या चीनने मंकीपॉक्‍सचा एक रुग्‍ण आढल्‍यानंतर एक नवा फतवा काढला आहे. परदेशातील नागरिकांना स्‍पर्श करु नका, असा इशारा चीनमधील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध विभागाने दिला आहे. या नव्‍या आदेशामुळे वाद निर्माण झाला आहे.( Monkeypox in China ) त्‍याची तुलना कोरोना साथीच्‍या आजारात परदेशातील वास्‍तव्‍यास असलेल्‍या आशियामधील लोकांशी झालेल्‍या भेदभावाशी केली जात आहे.

चीनमधील चोंगकिंग शहरात परदेशातून आलेल्‍या व्‍यक्‍तीला मंकीपॉक्‍सची लागण झाल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. ही व्‍यक्‍ती चीनची नागरिक आहे की स्‍थानिक हे चीनने अद्‍याप उघड केलेले नाही. चीनमधील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध विभागाचे ( सीडीसी) मुख्‍य शास्‍त्रज्ञ वू झुन्‍यू यांनी चीनमध्‍ये पहिला मंकीपॉक्‍स रुग्‍ण सापडल्‍याची घोषणा केली. ही घोषणा करताना मंकीपॉक्‍स पासून बचाव करण्‍यासाठी परदेशी नागरिकांना स्‍पर्श करु नका, असा फतवाही त्‍यांनी काढला. त्‍यांनी चीन सरकारच्‍या अधिकृत मायक्रोब्‍लॉगिंग वेबबोवरील यासंदर्भात पोस्‍टही केली. त्‍यामुळे नवा वाद निमार्ण झाला आहे. अनेकांनी त्‍याची तुलना कोरोना साथीच्‍या आराजारात परदेशातील वास्‍तव्‍यास असलेल्‍या आशियामधील लोकांबरोबर झालेल्‍या भेदभावाशी केली आहे.

Monkeypox in China : मंकीपॉक्‍स प्रतिबंधासाठी ‘सीडीसी’कडून पाच शिफारशी

यासंदर्भात ‘सीएए’ने दिलेल्‍या वृत्तानुसार, ‘सीडीसी’चे मुख्‍य शास्‍त्रज्ञ वू झुन्‍यू यांनी मंकीपॉक्‍सपासून चीनमधील नागरिकांनी बचाव करण्‍यासाठी पाच शिफारसी केल्‍या आहेत. या पाचपैकी पहिलीच शिफारस ही परदेशी लोकांना स्‍पर्श करु नका, अशी आहे. आतंतराष्‍ट्रीय प्रवास आणि संपर्कातूनच हा विषाणून अधिक पसरण्‍याची भीती असल्‍याचेही त्‍यांनी म्‍हटलं आहे.

मे २०२२ मध्‍ये मंकीपॉक्‍सची अनेक रुग्‍ण आढळले. ९० देशांमध्‍ये याचा फैलाव झाल्‍याने जागतिक आरोग्‍य संघटनेने मंकीपॉक्‍सला सार्वजनिक आरोग्‍य आणीबाणी घोषित केले होते. मंकीपॉक्‍स विषाणूची लागण ही बाधित व्‍यक्‍ती, प्राणी, किंवा विषाणू दुषित वस्‍तूंमधून होते. ‘सीडीसी’च्‍या मतानुसार मंकीपॉक्‍स विषाणू हा विषाणू बाधित त्‍वचा, श्‍वसन मार्ग आणि डोळे नाक किंवा तोडा द्वारे शरीरात प्रवेश करतो. संपूर्ण जगात चीनमुळेच कोरोना पसरला असा आरोप केला जात आहे. आता मंकीपॉक्‍सचा एक रुग्‍ण आढळल्‍यानंतर चीनकडून परदेशी नागरिकांबाबत भेदभावाचे धोरणाबाबत सवाल केले जात आहेत.

हेही वाचा : 

 

Back to top button