Monkeypox symptoms | मंकीपॉक्सची नवीन लक्षणं आली समोर, ‘या’ गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष! | पुढारी

Monkeypox symptoms | मंकीपॉक्सची नवीन लक्षणं आली समोर, 'या' गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष!

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : मंकीपॉक्स संदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. सध्या सुरु असलेल्या प्रादुर्भावामध्ये मंकीपॉक्सची लक्षणे (Monkeypox symptoms) ही आफ्रिकन देशांत याआधी नोंदवलेल्या लक्षणांपेक्षा वेगळी आहेत. ब्रिटिश मेडिकल जर्नल (BMJ) मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यास अहवालात हा दावा करण्यात आला आहे. लंडनमधील १९७ मंकीपॉक्स पॉझिटिव्ह पुरुषांमध्ये आढळून आलेल्या पूर्वलक्षी निरीक्षण विश्लेषणावर आधारावर ही माहिती देण्यात आली आहे. यातील १९७ पैकी १९६ व्यक्ती ह्या समलिंगी, उभयलिंगी किंवा पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या होत्या.

या अभ्यासानुसार २००७-२०११ दरम्यान डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि २०१७-१८ दरम्यान नायजेरियामध्ये पूर्वीच्या संसर्गाच्या तुलनेत सध्या गुदद्वारात वेदना (rectal pain) आणि पेनाईल सूज (penile swelling) अशी काही लक्षणे सामान्यपणे दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर संशोधकांनी शिफारस केली आहे की अशी लक्षणे असलेले रुग्ण डॉक्टरांनी मंकीपॉक्स बाधित म्हणून समजावेत.

काँगोमध्ये १९७० मध्ये पहिल्यांदा मानवांमध्ये मंकीपॉक्स आढळून आला होता. पण ५० वर्षांनंतर या विषाणूजन्य आजाराचा फैलाव आफ्रिकन प्रदेशांच्या बाहेर झाला. अमेरिका, ब्रिटन, युरोप आणि भारत यासह इतर देशांमध्ये या रोगाचा अचानक प्रसार झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्स उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.
मंकीपॉक्सचा उष्मायन कालावधी किंवा इन्क्यूबेशन पीरियड सध्या सुमारे १२ दिवसांचा (रेंज ५-२४ दिवस) समजला जातो. ताप, अस्वस्थता, घाम येणे, डोकेदुखी असे लक्षण ((Monkeypox symptoms) दिसून आल्यानंतर २-४ दिवसांनी त्वचेवर पुरळ उठतात.

 हे ही वाचा :

Back to top button