नारायणगाव : टीका करण्यापेक्षा राज्य सरकारला सूचना द्या; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे प्रत्युत्तर | पुढारी

नारायणगाव : टीका करण्यापेक्षा राज्य सरकारला सूचना द्या; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे प्रत्युत्तर

नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा: संबंधित रस्ता हा अष्टविनायक महामार्गापैकी असून तो राज्य सरकारच्या अखत्यारित आहे. कोल्हे मळ्यातील जो रस्ता आहे, तेथील स्थानिक भूमिपुत्रांना त्यांचा जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. त्यासाठीचा 25 कोटी रुपयांचा निधीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रलंबित आहे. त्यामुळे रस्त्याचे काम रखडले असल्याचे प्रत्युत्तर खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी दिले.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना त्यांच्या नारायणगाव येथील कार्यालयापासून जाणारा रस्ता करता आला नाही, ते काय शिरूर लोकसभेचा विकास करणार, असा उपरोधिक टोला केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांनी खासदार कोल्हे यांना नाव न घेता नारायणगाव येथील लोकसभा प्रवास योजनेच्या सभेतून गुरुवारी (दि. 15) लगावला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना खा. कोल्हे बोलत होते.

केंद्रीय मंत्री रेणुका सिंह यांनी केवळ राजकारणापोटी टीका करण्यापेक्षा राज्यात त्यांच्या विचाराचे सरकार आहे. त्यामुळे राज्य सरकारने त्यांना तशा सूचना द्याव्यात. स्थानिक भूमिपुत्रांचा हक्क, त्यांचा निधी आहे, तो त्वरित मिळवून देण्यासाठी त्यांनी सहकार्य केले तर स्थानिक भूमिपुत्रांवरील अन्याय दूर होईल आणि रस्तासुद्धा तातडीने आपल्याला करता येईल, असेही खा. डॉ. कोल्हे म्हणाले.

 

Back to top button