आधुनिक भारताच्या उभारणीत अभियंत्यांचे महत्त्‍वपूर्ण योगदान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

आधुनिक भारताच्या उभारणीत अभियंत्यांचे महत्त्‍वपूर्ण योगदान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाला स्वयंपूर्ण करण्यात अभियंत्यांनी मोठी मेहनत घेतली. त्यांनी खऱ्या अर्थाने राष्ट्र उभारणी केली असल्याच्या भावना मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या. सोशल मिडियावर शुभेच्छा संदेश शेअर करत त्यांनी राष्ट्रीय अभियंता दिनानिमीत्त अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच ज्यांच्या जयंतीनिमित्त हा दिन साजरा करण्यात येतो ते भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्या यांना देखील त्यांनी अभिवादन केले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी या संदेशात म्हटले आहे की, राष्ट्र उभारणीत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या सर्व अभियंत्यांना मनापासून शुभेच्छा. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशाला स्वयंपूर्ण करण्यात अभियंत्यांनी मोठी मेहनत घेतली आहे. त्यांनी खऱ्या अर्थानं राष्ट्र उभारणी केली आहे. प्रगत राष्ट्रांनीही दखल घ्यावी, असे प्रकल्प व उद्योग-कारखाने उभे केले आहेत.

अभियंत्यांच्या या योगदानामुळेच आपल्या देशाच्या पायाभूत सुविधा, कृषी-सिंचन, औद्योगीक अशा सर्वच क्षेत्रातील वैभवात भर घातली गेली आहे. महाराष्ट्रानेही अभियांत्रिकी क्षेत्रातील चमक अनेक अर्थाने सिद्ध केली आहे. त्यामुळेच आपले राज्य देशाच्या औद्योगीक आणि अभियांत्रीकी क्षेत्रातील आघाडीचे राज्य म्हणून ओळखले जाते. गतीमान आणि बलशाली असा आधुनिक भारत उभा करण्यात अभियंत्याच्या या योगदानाला आपण दाद द्यावीच लागेल. त्यांच्याकडून यापुढेही राष्ट्रउभारणीत असेच योगदान दिले जाईल, असा विश्वास असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्‍या संदेशात म्हटलं आहे.

हेही वाचा :

Back to top button