Vedanta-Foxconn : पेंग्विनसेनेला थापेबाजी करून गुजरात बद्दल शत्रुत्व निर्माण करायचंय : आशिष शेलारांचा विरोधकांवर हल्लाबोल | पुढारी

Vedanta-Foxconn : पेंग्विनसेनेला थापेबाजी करून गुजरात बद्दल शत्रुत्व निर्माण करायचंय : आशिष शेलारांचा विरोधकांवर हल्लाबोल

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातला गेलेला प्रकल्प महाराष्ट्रात होता तरी कधी? गुजरातने प्रकल्प नेला, कशाच्या आधारे बोलता? करारनामा दाखवा? पेंग्विनसेनेला थापेबाजी करून गुजरातबद्दल शत्रुत्व निर्माण करायचंय, असा हल्लाबोल भाजप नेते आशिष शेलार यांनी विरोधकांवर केला. फॉक्सकॉन प्रकल्पावरून (Vedanta-Foxconn) महाविकास आघाडीच्या आरोपांना प्रत्यूत्तर देण्यासाठी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यात तब्बल दीड लाख कोटींची गुंतवणूक आणू शकणारा फॉक्सकॉन-वेदांता (Vedanta-Foxconn) प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली. तळेगावचा प्रकल्प गुजरातला गेला असला तरी याच फॉक्सकॉन कंपनीचा आयफोन आणि इलेक्ट्रॉनिक हब महाराष्ट्रात उभारला जाईल, अशी हमी पंतप्रधानांनी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. भाजप नेते आशिष शेलार यांनीही आज पत्रकार परिषद घेत विरोधकांच्या टीकेला प्रत्यूत्तर दिले.

पेंग्विनसेनेचे याकुबच्या कबरीखाली हात हिरवे झाले आहेत. याकुब मेमन प्रकरणात हात रंगल्याने विरोधक त्या प्रकरणातून पळवाट काढू पाहतायत. दारू विक्रेत्यांसाठी महाविकास आघाडीकडून पायघड्या घातल्या जातात. मात्र फॉक्सकॉनला अडथळे आणले जात आहेत. कट कमिशनमुळे फॉक्सकॉन प्रकल्प न आल्याचा संशय आहे. या प्रकल्पाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून सत्य समोर आणावं. विरोधक गुजराती माणसांबद्दल शत्रूत्व निर्माण करत आहेत, असे प्रत्युत्तर शेलार यांनी दिले आहे.

हेही वाचा :

Back to top button