कोल्हापूर : हुपरीतील गणेश मंडळांना राजस्थानमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिमा भेट | पुढारी

कोल्हापूर : हुपरीतील गणेश मंडळांना राजस्थानमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिमा भेट

हुपरी; पुढारी वृत्तसेवा : हुपरी परिसरातील गणेश मंडळांना भाजप व महावीरअण्णा गाट सोशल फौंडेशनच्या वतीने राजस्थान येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिमा भेट देण्यात आल्या. हुपरीतील दै. पुढारीचे पत्रकार व माजी नगरसेवक अमजद नदाफ यांच्या पाठपुराव्यामूळे राजस्थान सरकारने तेथील उद्यानाचे सुशोभीकरण केले. नदाफ यांच्या या  कार्याचा अभिमान हुपरी परिसराला असून हे कार्य चिरंतन रहावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे, असे प्रतिपादन अमित गाट यांनी केले.

राजस्थानमधील अजमेर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे सुशोभीकरण व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची रंगरंगोटी करण्यासाठी अमजद नदाफ यांनी मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यामूळे उद्यानाचे सुशोभीकरण करण्यात आले. नदाफ यांच्या या कार्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार संजय राऊत, खासदार संजय मंडलिक यांनी अभिनंदन पत्र पाठवले आहे. हे कार्य स्मरणात रहावे यासाठी राजस्थान येथील रंगरंगोटी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिमा परिसरातील गणेश मंडळांना भेट दिल्या जात असल्याचे गाट यांनी सांगितले.

यावेळी अमित गाट, रफीक मुल्ला, अमजद नदाफ,  मुबारक शेख, शिवाजी भानसे, अरविंद गायकवाड, नगरसेवक सचिन गाट, संजय निकम, जयकुमार माळगे, सुभाष कागले, अजित पाटील, उदय शिंदे, अजित उगळे, तानाजी घोटने, रोहीत पाटील, रणजित पाटील  आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button