Live Streaming : सुप्रीम कोर्ट कामकाजाच्या लाइव्ह स्ट्रिमिंगवर न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले, हे खुले न्यायालय… | पुढारी

Live Streaming : सुप्रीम कोर्ट कामकाजाच्या लाइव्ह स्ट्रिमिंगवर न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले, हे खुले न्यायालय...

पुढारी ऑनलाईन : मंगळवारी जेव्हा सर्वोच्च न्यायालय कामाकाजासाठी सज्ज झाले. तेव्हा या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यावर बोलताना न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी हे खुले न्यायालय असून, न्यायालयीन कामकाजाचे रेकॉर्डिंग हा मुद्दा नसावा असे वक्तव्य केले आहे. या त्यांच्या भूमिकेमुळे सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज अधिक पारदर्शक बनवण्यात एक पाऊस पुढे टाकले असल्याचे स्पष्ट होते.

यावेळी घडलेली रंजक घटना सांगताना आणि तंत्रज्ञानाच्या मुद्दयावर बोलताना ते म्हणाले की, काल न्यायालयीन कामकाज रेकॉर्ड करण्यासाठी कोणीतरी मोबाईल वापरत असल्याचे पाहिले. मी जेव्हा त्या व्यक्तीला मोबाईलवर रेकॉर्ड करताना बघितले, तेव्हा माझ्या मनात तीच जुनी भावना होती. तो कसा काय रेकॉर्ड करू शकतो? पण नंतर मी पुन्हा विचार केला तेव्हा ही काही मोठी गोष्ट नाही याची जाणीव झाली. मी उघडपणे एखादी गोष्ट बोलत असेल, ते कोणालातरी रेकॉर्ड करायचे असेल, हे काही गोपनीय नाही, यामध्ये कोणतीही मोठी गोष्ट नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या ई-समितीचे अध्यक्ष असलेले न्यायमूर्ती चंद्रचूड हे न्यायालयांमध्ये तंत्रज्ञानाच्या वापराचे मोठे समर्थक आहेत. त्यांच्याच देखरेखीखाली भारतातील न्यायालयात ई-फायलिंग सुरू करण्यात आले आणि आज अनेक न्यायालये डिजिटायझेशनकडे वाटचाल करत आहेत. देशातील अनेक उच्च न्यायालयांनीही यूट्युबवरून कामकाजाचे थेट प्रक्षेपणदेखील सुरू केले आहे.

हेही वाचा:

Back to top button