कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातून महिलेचे दागिने लंपास | पुढारी

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातून महिलेचे दागिने लंपास

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  अंबाबाई देवीच्या दर्शनाला आलेल्या भाविक महिलेच्या पर्समधील दोन तोळ्यांचे दागिने अज्ञाताने लंपास केले. मंदिराच्या पूर्व दरवाजात दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रतीक्षा सोनू पोवार (वय 32, रा. हिरानंदाणी इस्टेट, ठाणे) यांनी याबाबत जुना राजवाडा पोलिसांत फिर्याद दिली.

फिर्यादी प्रतीक्षा पोवार या मंगळवारी अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनाला आल्या होत्या. त्यांनी सोन्याचे मनी, लॉकेट असलेली सोनसाखळी व कानातील टॉप्स एका प्लास्टिक डबीत ठेवले होते. मंदिराच्या पूर्व दरवाजावर आल्या असताना त्यांना पर्समधील ही डबी नसल्याचे आढळले. अज्ञाताने गर्दीचा फायदा घेत पर्समधील हे दागिने चोरून नेल्याची फिर्याद त्यांनी पोलिसांत दिली.

Back to top button