देशात यापूर्वी अनेक गड उद्ध्वस्त झालेत, बावनकुळेंचा शरद पवारांना बारामतीत सूचक इशारा | पुढारी

देशात यापूर्वी अनेक गड उद्ध्वस्त झालेत, बावनकुळेंचा शरद पवारांना बारामतीत सूचक इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात अनेकवेळा मोठे गड उद्ध्वस्त झाले आहेत. वेळ प्रत्येकाची येते, एकाच व्यक्तीचा गड राहत नाही, तर  ते जनता ठरवते, असा सूचक इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांना दिला आहे. बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघातून चंद्रशेखर बावनकुळे यांनी आजपासून दौऱ्याला सुरूवात केली. कन्हेरी गावातील हनुमान मंदिरातून या दौऱ्याचा प्रारंभ झाला. जनता धोकेबाजाला बाजूला करेल आणि जे खरे हिंदूत्वाचे रक्षणकर्ते आहेत त्यांना मदत करेल. अर्थमंत्री निर्मला सितारामण ५ ते ६ वेळा बारामतीत येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीला कंटाळून अनेक जण भाजपात प्रवेश करतील. संघटन मजबूत करणे, केंद्र व राज्य सरकारच्या गरिब कल्याण योजना लोकांपर्यंत पोहचविण हा उद्देश या दौऱ्याचा आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील शिवसेना व भाजप मिळून ४५ पेक्षा अधिक लोकसभेच्या व २०० पेक्षा जास्त विधानसभेच्या जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. देशात याआधी अनेक गड उद्ध्वस्त झाले आहेत. आतापर्यंत बारामती मतदारसंघात फाईट झाली नाही, ती येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत होईल, असा सूचक इशारा बावनकुळे यांनी पवारांना दिला आहे. आज रात्री १० पर्यंत ते बारामती मतदारसंघाचा दौरा करणार आहेत.

हेही वाचा :

Back to top button