मुंबई-पुणे महामार्गावर नितेश राणेंच्या गाडीला अपघात | पुढारी

मुंबई-पुणे महामार्गावर नितेश राणेंच्या गाडीला अपघात

पिंपरी; पुढारी ऑनलाईन : मुंबई-पुणे महामार्गावर भाजप नेते नितेश राणे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. यावेळी गाडीत नितेश राणे यांची पत्नी, मुले आणि नातेवाईक होते. ट्रकने त्यांच्या गाडीला पाठीमागून धडक दिली. ही घटना उर्से टोल नाका येथे घडली. नितेश राणे यांचे कुटुंबीय पुण्याच्या दिशेने येत होते. या दरम्यान अपघात झाला.

हा अपघात किरकोळ स्वरुपाचा असून कोणालाही दुखापत झालेली नाही. या अपघातानंतर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि एका ट्रकचालकाला ताब्यात घेतले. पुण्याच्या दिशेने येत असताना राणे यांची गाडी उर्से टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी थांबली होती. यादरम्यान पाठीमागून ट्रकने नितेश राणे यांच्या गाडीला धडक दिली. या प्रकरणी अधिक चौकशी केली जात आहे.

हे ही वाचा :

Back to top button