गडचिरोली : ‘नीट’मधील अपयशाच्या धास्तीने विद्यार्थ्याची आत्महत्या | पुढारी

गडचिरोली : 'नीट'मधील अपयशाच्या धास्तीने विद्यार्थ्याची आत्महत्या

गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा : दुसऱ्यांदा दिलेल्या ‘नीट’ परीक्षेत अपयश येईल या धास्तीने एका विद्यार्थ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना एटापल्ली तालुक्यातील पंदेवाही येथे घडली. हर्षद सदू तलांडे (१८) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

हर्षद याने २०२१ बारावी उत्तीर्ण केल्यानंतर ‘नीट’ परीक्षा दिली होती. मात्र, कमी गुण मिळाल्याने त्याला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. यामुळे त्याने यंदा दुसऱ्यांदा नीट परीक्षा दिली. १९ ऑगस्टला नागपूरहून तो घरी परतला होता. पण यंदाही कमी गुण मिळतील, या भीतीने त्याला ग्रासले होते. याच भीतीने त्याने मंगळवारी सकाळी विष प्राशन केले. ही बाब लक्षात येताच कुटुंबियांनी त्याला एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण प्रकृती अधिक बिघडल्याने त्याला चंद्रपूरला हलविण्यात आले.

उपचारादरम्यान बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. मृत विद्यार्थ्याचे वडील शिक्षक असून आई ग्रामपंचायत सदस्य आहे.

हे ही वाचा :

Back to top button