सातार्‍याजवळ भरधाव ट्रकला अपघात; एक जखमी | पुढारी

सातार्‍याजवळ भरधाव ट्रकला अपघात; एक जखमी

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सांगलीहून पुण्याकडे निघालेला भरधाव ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक दुभाजकाला धडकला. यावेळी पाठीमागून येणारा भरधाव ट्रक समोरील ट्रकवर आदळून अपघात झाला. ही घटना बुधवारी रात्री सातारा शहराजवळ घडली. सुदैवाने जीवितहानी झाली नसून दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीहून पुण्याकडे निघालेल्या ट्रक चालकाचा अचानक ताबा सुटल्यामुळे ट्रक दुभाजकाला धडकला. याचवेळी पाठीमागून येणार्‍या दुसर्‍या ट्रक चालकाचेही नियंत्रण सुटल्याने ट्रक समोरील ट्रकवर आदळला. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एक चालक अडकल्याने तात्काळ त्याची माहिती पोलिसांना देवून क्रेन मागवण्यात आली. सुमारे 1 तासाने चालकाला क्रेनद्वारे ट्रकमधून बाहेर काढण्यात आले. उपचारासाठी त्याला सिव्हीलमध्ये दाखल करण्यात आले. या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले असून ट्रकच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे.

हेही वाचा :

Back to top button