

पुढारी ऑनलाईन : प्रेम, आपुलकी आणि उत्कटता या गोष्टी माणसाला कल्पनाशील बनवतात. प्रेम प्रत्येक माणसाच्या मनात असते. हीच प्रेमाची संकल्पना अतिशय वेगळ्या पद्धतीने 'प्रेम म्हणजे काय असतं' या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. या चित्रपटाचं मोशन पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले असून, येत्या ४ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
तख्त प्रॉडक्शन यांनी 'प्रेम म्हणजे काय असतं' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रसाद दत्तात्रय इंगवले यांनी चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती अशी तिहेरी जबाबदारी निभावली आहे. अद्याप चित्रपटातील कलाकारांची नावे गुलदस्त्यात असून ती लवकरच जाहीर होणार आहे. प्रेम ही संकल्पना अत्यंत वेगळ्या पद्धतीने या चित्रपटात मांडण्यात आली आहे.
प्रेम या संकल्पनेवर आजवर अनेक चित्रपट बनवले गेले आहेत. मात्र, याच संकल्पनेचा आणखी एक वेगळा पैलू 'प्रेम म्हणजे काय असतं' या चित्रपटातून मांडला जाणार आहे. या चित्रपटातून एक हृदयस्पर्शी प्रेमकथा चाहत्याच्या भेटीस येत आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
हेही वाचलंत का?