भांडुपमध्ये शिवसेनेला खिंडार; माजी आमदार अशोक पाटील शिंदे गटात | पुढारी

भांडुपमध्ये शिवसेनेला खिंडार; माजी आमदार अशोक पाटील शिंदे गटात

भांडुप, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या भांडुपमध्येच शिवसेनेला खिंडार पडले आहे. माजी आमदार अशोक पाटील यांनी काही पदाधिकाऱ्यांसोबत आज (दि.२२) एकनाथ शिंदे गटाची वाट धरली. आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेनंतर अशोक पाटील हे नाराज असल्याची चर्चा भांडु मध्ये सुरू होती. भांडुपमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून अखेर शिंदे गटाची वाट धरत असल्याचे अशोक पाटील यांनी सांगितले.

शिंदे गटात सामील होणाऱ्यांचे हातपाय तोडू, असा इशारा जेव्हा शिवसैनिकांनी दिला. त्यावेळी व्यथित होऊन आपण हा निर्णय घेतला असून जर कुणी आमचे हात पाय तोडणार असतील, तर त्यांनी तारीख आणि वेळ सांगावी, असा इशारा अशोक पाटील यांनी शिवसैनिकांना दिला आहे. आज शेकडो कार्यकर्त्यांसह अशोक पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या गटात प्रवेश करणार आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button