निवडणूक आयोगाचा महत्त्‍वाचा निर्णय : जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये परराज्‍यातील नागरिकांसह सुरक्षा दलाच्‍या जवानांनाही मतदानाचा हक्‍क | पुढारी

निवडणूक आयोगाचा महत्त्‍वाचा निर्णय : जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये परराज्‍यातील नागरिकांसह सुरक्षा दलाच्‍या जवानांनाही मतदानाचा हक्‍क

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापूर्वी राज्‍याचे राज्‍याचे मुख्‍य निवडणूक अधिकारी हिरदेश कुमार यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये वास्‍तव्‍य असणारे परराज्‍यांमधील नागरिक व सुरक्षा दलाचे जवान यांना मतदानाचा अधिकार असेल, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे. संबंधित नागरिक व सुरक्षा दलाचे जवान हे मतदान यादीत आपले नाव येण्‍यासाठी अर्ज करु शकतात. यासाठी त्‍यांना रहिवासी प्रमाणपत्राचा आवश्‍यकता नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.
( jammu-kashmir voting list )

मूळ राज्‍यातील मतदार नोंदणी रद्‍द करणे आवश्‍यक

,मतदार यादीत नावाचा समावेश करण्‍यासाठी संबंधित व्‍यक्‍तंने त्‍याच्‍या मूळ राज्‍यातील मतदान नोंदणी रद्‍द करणे आवश्‍यक आहे. या निर्णयामुळे राज्‍यात २५ लाख मतदार वाढतील, असा विश्‍वासही हिरदेश कुमार यांनी व्‍यक्‍त केला. परराज्‍यातील कर्मचारी, विद्‍यार्थी, कामगार, सुरक्षा दलांमधील जवान हे आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकतात. राज्‍यात ३७० कलम हटविल्‍यानंतर प्रथमच मतदान यादीमध्‍ये सुधारणा होत आहे. यामुळे मतदार संख्‍या मोठ्या प्रमाणावर वाढण्‍याची शक्‍यता आहे. असेही ते म्‍हणाले.

हेही वाचा : 

 

Back to top button