Adani Gets ‘Z’ Security : उद्योगपती गौतम अदानी यांना ‘झेड’ सुरक्षा, जाणून घ्‍या महिन्‍याचा खर्च… | पुढारी

Adani Gets 'Z' Security : उद्योगपती गौतम अदानी यांना 'झेड' सुरक्षा, जाणून घ्‍या महिन्‍याचा खर्च...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशातील ख्‍यातनाम उद्योगपती आणि अदानी ग्रूपचे चेअरमन गौतम अदानी यांना केंद्र सरकारने झेड दर्जाच्‍या सुरक्षा पुरवली आहे. आता यापुढे त्‍यांना केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) कमांडो सुरक्षा कवच असेल. मात्र या सुरक्षेसाठी त्‍यांना स्‍वत: खर्च करावा लागणार आहे. ( Adani Gets ‘Z’ Security ) त्‍यांना सुरक्षेसाठी महिन्‍याला सुमारे १५ ते २० लाख रुपये इतका खर्च येणार आहे.

सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, अदानी ग्रुपचे अनेक प्रकल्‍प सुरु आहेत. गुप्‍तचर विभागाने ६० वर्षीय अदानी यांच्‍या जीवाला धोका असल्‍याचा अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयास सादर केला होता. या माहितीच्‍या आधारे केंद्रीय गृह मंत्रालयाने गौतम अदानी यांना सुरक्षा पुरवली आहे.

Adani Gets ‘Z’ Security : अंबानींच्‍या पाठोपाठ अदानींनाही सुरक्षा

केंद्रीय गृह मंत्रालयाने सीआरपीएलच्‍या अतिविशिष्‍ठ व्‍यक्‍तींसाठी असणार्‍या सुरक्षा शाखेवर अदानी यांच्‍या सुरक्षेची जबाबदारी सोपवली आहे. सीआरपीएफचे कमांडो ही जबाबदारी पार पडतील. यापूर्वी २०१३ मध्‍ये देशातील आघाडीचे उद्योगपती आणि रिलायंस इंडस्‍ट्रीज लिमिटेडचे अध्‍यक्ष मुकेश अंबानी यांना झेड प्‍लस सुरक्षा देण्‍यात आली होती. अदानी यांना स्‍वत:ला सुरक्षेचा खर्च करावा लागणार आहे. या सुरक्षेसाठी त्‍यांना दर महिन्‍याला १५ ते २० लाख रुपये खर्च येण्‍याची शक्‍यता आहे. जगातील श्रीमंत व्‍यक्‍तींच्‍या यादीत गौतम अदानी चौथ्‍या क्रमाकांवर आहेत.

हेही वाचा : 

 

 

Back to top button