पुणे : ‘आरएसएस संघराज्य’ या फेक खातेधारकावर गुन्हा; आक्षेपार्ह लिखाण प्रकरण | पुढारी

पुणे : ‘आरएसएस संघराज्य’ या फेक खातेधारकावर गुन्हा; आक्षेपार्ह लिखाण प्रकरण

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘आरएसएस संघराज्य’ या नावाने बनावट अकाउंट उघडून त्याद्वारे सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी पुण्यातील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘आरएसएस संघराज्य’ या बनावट नावाने सोशल मीडियात लिखाण करणार्‍या खातेधारकावर हा गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगरचे कार्यवाह महेश संभाजी करपे (वय 50, रा. चंदननगर) यांनीच याबाबतची फिर्याद दिली असून, संबंधितांवर कारवाई करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट!
खातेधारकाने लाईव्ह चॅटदरम्यान आक्षेपार्ह लिखाण केल्याचा स्क्रीनशॉट राष्ट्रवादीचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केला होता. यामध्ये त्यांनी मुंबई पोलिसांना टॅग करत कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतर पुण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.

Back to top button