नवी दिल्ली : गेल्या 24 तासात कोरोनाचे १८ हजारांहून अधिक रुग्ण आढळले | पुढारी

नवी दिल्ली : गेल्या 24 तासात कोरोनाचे १८ हजारांहून अधिक रुग्ण आढळले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात कोरोना संसर्गाच्या रुग्णांच्या संख्येत चढ-उतार वाढ सुरूच आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 18,738 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर, एका दिवसापूर्वी 19,406 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, आता देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1,34,933 वर पोहोचली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, एकूण कोरोना रुग्णांच्या तुलनेत सक्रिय रुग्ण 0.31 टक्के आहेत.

24 तासात कोरोनामुळे 40 जणांचा मृत्यू

गेल्या 24 तासांत देशात 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात केरळमधील आठ जणांचा समावेश आहे. यासह, देशातील कोरोनामुळे एकूण मृत्यूंची संख्या 5,26,689 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात नऊ, छत्तीसगड आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी चार, मणिपूरमध्ये तीन, मध्य प्रदेशात दोन, तर बिहार, दिल्ली, हिमाचल प्रदेश, झारखंड, कर्नाटक, केरळ, मेघालय, ओडिशा, पंजाब व त्रिपुरा या राज्यांमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

संसर्ग दर पुन्हा पाच टक्क्यांच्या वर

देशात दैनंदिन संसर्गाचे प्रमाण पुन्हा एकदा पाच टक्क्यांच्या पुढे गेला आहे. तर साप्ताहिक दर 4.63 टक्के आहे. याशिवाय कोरोना रिकव्हरी रेट 98.50 टक्के आहे.

Back to top button