Shivsena : ठाकरे आणि शिवसेना हे नातं घट्टच राहणार; उद्धव ठाकरे यांचा विश्वास | पुढारी

Shivsena : ठाकरे आणि शिवसेना हे नातं घट्टच राहणार; उद्धव ठाकरे यांचा विश्वास

पुढारी ऑनलाईन डेस्क : कितीही वादळं आली तरी शिवसेनेची मुळं घट्ट आहेत. ठाकरे आणि शिवसेना (Shivsena) हे नातं घट्टच राहणार, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. पदाधिकाऱ्यांचे शपथपत्र आणि सदस्य नोंदणी ही माझी वाढदिवसाची भेट असेल, असे आवाहन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना केले. मुंबईतील शिवडी येथील नुतनीकरण केलेल्या शिवसेना शाखेच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान ते बोलत होते. अभ्युदयनगर या शाखेच्या काळाचौकी येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले, त्याचबरोबर त्यांच्या हस्ते हा सोहळा देखील पार पडला.

या उद्धाटन सोहळ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदार आणि भाजपवर टीका केल्या. बंड करून जे गेले त्यांच्याबरोबर सच्चा शिवसैनिक नाही. आता पुन्हा एकदा सामान्यातून असामान्य शिवसैनिक घडवायचा आहे. सत्तेचं पन्नास टक्के वाटप ठरलेलं होतं. हे जर त्याचवेळी केलं असतं तर आज मनावर दगड ठेवण्याची वेळ आली नसती. (Shivsena)

ज्या मनगटावर शिवसेनेचा शेंदूर फासला होता ते आज शिवसेना गिळायला निघाले आहेत. तुम्ही कुणाशी पंगा घेतलाय हे लवकरच कळेल. दिल्लीच्या तख्ताला झुकवणारं आमचं रक्त आहे. बंडखोरांना कुठल्यातरी पक्षात जावंच लागेल. ही बंडखोरी नाही तर हरामीपणा आहे. बंडखोरांनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने मतं मागू नये, हिंमत असेल तर स्वत:च्या नावावर मत मागा असे आव्हान देखील त्यांनी बंडखोरांना केले.

हेही वाचा

Back to top button