पुढारी वृत्तसेवा : नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी काँग्रेसचे नेते पवन खेडा, जयराम रमेश यांच्यासह काँग्रेस पक्षाला कायदेशीर नोटीस बजावली आहे. ईराणी यांची मुलगी गोव्यात अवैध बार चालविते, असा गंभीर आरोप काँग्रेस नेत्यांनी केला होता. तर दुसरीकडे सर्व आरोप चुकीचे असल्याचे ईराणी यांनी सांगितले होते. चुकीचे आरोप केल्याबद्दल संबंधित नेत्यांनी विनाशर्त माफी मागावी, असे ईराणी यांनी नोटिशीमध्ये म्हटले आहे.