एकनाथ शिंदेंनी खासदार किर्तीकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा | पुढारी

एकनाथ शिंदेंनी खासदार किर्तीकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर पश्चिमचे शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण आले. उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार गजानन किर्तीकर यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी सांगितले होते. आपण संसदेत देखील जाणार नसल्याचे सांगितले होते. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी आले असता सुमारे १०० पोलिसांचा फौजफाटा तेथे होता.

काही दिवसांपूर्वी शिंदे गटाने राज्यात सत्ता स्थापन करित उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. दोन दिवसांपूर्वी १२ खासदारांनी एकनाथ शिंदे याना आपले समर्थन देत लोकसभा अध्यक्षांना पत्रदेखील दिले होते. याच पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचे बोलले जात आहे. येत्या काही दिवसात खासदार गजानान किर्तीकर हे शिंदे गटात दिसतील? अशा चर्चा होऊ लागल्या आहेत.

याबाबत सुनील प्रभु यांना विचारले असता गजानन किर्तीकर हे जसे आमचे नेते आहेत तसेच ते त्यांचेदेखील नेते होते. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री आले त्यात वावगे असे काहीच नाही, असे त्यांनी सांगितले.

Back to top button