औरंगाबादच्या नामांतराला उद्याच्या कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब करणार – मुख्यमंत्री | पुढारी

औरंगाबादच्या नामांतराला उद्याच्या कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब करणार - मुख्यमंत्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : औरंगाबादच्या नामांतराला उद्याच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये मान्यता देणार, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत सांगितले. आमदार अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार आज मुंबईत आयोजित केला. यावेळी ते बोलत होते.

औरंगाबाद नामांतर स्थगितीनं काय साध्य केलं, हे फडणवीसांना विचारा : संजय राऊत

औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराची नावे बदलण्यात यावी अशी मागणी अनेक दिवसापासून केली जात होती. त्याबाबत महाविकास आघाडी सरकारने नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यास मंजुरी देण्यात आली होती. मात्र, ज्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला ती बैठक ती बेकायदेशीर होती, असे सांगत शिंदे गट-भाजप सरकारने त्या निर्णयाला स्थगिती दिली. याशिवाय लवकरच पुढच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये यावर निर्णय घेऊ असेही या सरकारने स्पष्ट केले होते. यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती.

मुंबई येथे बोलताना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादच्या नामांतराला पुढील कॅबिनेट बैठक घेऊन निर्णयावर शिक्कामोर्तब करणार असे स्पष्ट केले.

औरंगाबाद नामांतर स्थगितीनं काय साध्य केलं, हे फडणवीसांना विचारा : संजय राऊत

औरंगाबाद : वन विभागासमोर मेंढपाळांचे बोंबाबोंब आंदोलन

औरंगाबाद : अवैधरित्या गॅस भरताना ओमिनीचा स्फोट

Back to top button