औरंगाबाद : अवैधरित्या गॅस भरताना ओमिनीचा स्फोट | पुढारी

औरंगाबाद : अवैधरित्या गॅस भरताना ओमिनीचा स्फोट

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : ओमनी गाडीत अवैधरित्या गॅस भरताना स्फोट झाल्याची घटना गुरूवारी (दि. १४ जुलै) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पडेगाव येथील रेणुका हॉस्पिटलसमोर घडली. ओमनी (गाडी क्र.एमएच २० वाय ९६२९ )मध्ये गॅस भरत असताना प्रारंभी गाडीला आग लागली व काही क्षणात गाडीचा स्फोट झाला.

घटना घडताच गाडीत गॅस भरणाऱ्या लोकांनी आग लागली असल्याचे समजताच तेथून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच शिवसेना शाखा प्रमुख राहुल यलदी यांनी छावणी पोलीस ठाण्यास फोन करून घटनेबाबत कळवले. नागरिक घटनास्थळी मदतीला धावले व लोकांना दूर केले, आग लागल्यानंतर लगेच लोकांना दूर केल्याने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. .

हेही वाचलंत का?

Back to top button