औरंगाबाद : वन विभागासमोर मेंढपाळांचे बोंबाबोंब आंदोलन | पुढारी

औरंगाबाद : वन विभागासमोर मेंढपाळांचे बोंबाबोंब आंदोलन

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : वनक्षेत्रात मेंढीचराईस परवानगी मिळावी, औरंगाबाद जिल्हयातील मेंढपाळांवरील वनकर्मचा-यांकडून होणारा अत्याचार व छळ थांबवावा, या मागणीसाठी जय मल्हार सेनेच्या वतीने शुक्रवारी (दि.१५) उपवनसंरक्षक कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

मेंढपाळांना न्याय मिळाला पाहिजे, येळकोट येळकोट जय मल्हार, हा आवाज कुणाचा, जय मल्हार सेनेचा, मेंढपाळांना चराई पास मिळालाच पाहिजे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच मेंढपाळांना त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नावानं बोंब मारून निषेध केला. जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख दत्तात्रय म्हेत्रे, शिवाजी काटकर, कारभारी दांगोडे, नाना साबळे यांच्या सह मेंढपाळ सहभागी झाले होते. २ ऑगस्ट ला महात्मा फुले चौकातून उपवनसंरक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही शेवाळे यांनी यावेळी दिला.

हेही वाचलंत का?

Back to top button