औरंगाबाद नामांतर स्थगितीनं काय साध्य केलं, हे फडणवीसांना विचारा : संजय राऊत | पुढारी

औरंगाबाद नामांतर स्थगितीनं काय साध्य केलं, हे फडणवीसांना विचारा : संजय राऊत

मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क : औरंगाबाद नामांतराचा निर्णय फिरवण्याचा अधिकार सरकारला नाही. आता सरकारचा ढोंगीपणा उघड झाला आहे. सरकार हिंदुत्वविरोधी आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर केली आहे. नामांतर स्थगितीनं काय साध्य केलं, हे मुख्यमंत्र्यांना नको तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारा. कारण मुख्यमंत्र्यांचा हातात काही नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी यावेळी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हा उस्मान मुघलकाळातील तुमचा कोण लागतो. नामांतरासाठी भाजपनं आंदोलन केली आहेत. राज्यातील सरकार गोंधळलेलं आहे. सत्ताधाऱ्यांचं औरंगजेबाशी नाते काय आहे, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला.

संजय राऊत पुढे म्हणाले, नामांतराचा निर्णय रद्द करणार शिंदे सरकार हिंदुत्वविरोधी आहे. नामांतराचे ५ निर्णय राजकीय नसतानाही स्थगिती का देण्यात आली? शिवसेना संपवायला मी शिवसेनेचा मालक आहे का? असा सवालही त्यांनी केला. आता संसदेत आता हात पाय बांधून, तोंड बंद करून जावं लागेल, असा टोला संसद आवारात आंदोलन बंदीच्या आदेशावर संजय राऊतांनी लगावला.

 

Back to top button