गडचिरोली : पर्लकोटा नदीला पूर; १०० हून अधिक गावांचा संपर्क तुटला | पुढारी

गडचिरोली : पर्लकोटा नदीला पूर; १०० हून अधिक गावांचा संपर्क तुटला

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड-आलापल्ली मार्ग बंद झाला आहे. पुलावरुन तीन फूट पाणी वाहू लागल्याने परिसरातील शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.

सिरोंच्या तालुक्यातील गोदावरी व प्राणहिता नदीमधील वाढलेल्या पाणी पातळीमुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. संभाव्य धोका लक्षात घेता तालुक्यातील १२ गावांमधील नागरिकांना घरे रिकामी करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यामध्ये सिरोंचा रै (छोटा बाजार), सूर्यरापल्ली (सिरोंचा माल), मंडलापूर, मद्दिकुंठा, जानमपल्ली वे. लँ., मृदुक्रिष्णापुर, आयपेठा रै, सोमनूर माल अंशतः, नडिकूडा, कोत्तूर रै, असरअल्ली, अंकिसा कंबाल पेठा टोला या गावांचा समावेश आहे.

मागील चोवीस तासांत अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथे ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने तब्बल ३२५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आलापल्ली व नागेपल्ली येथे अनेक घरांत पुराचे पाणी शिरले. आपत्ती व्यवस्थापनाकडून आतापर्यंत ८७ जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढले आहे.

हेहा वाचा :

Back to top button