परभणी : आयपीएस लोढांच्या बॉडीगार्डचीच दुचाकी चोरट्यांनी पळवली | पुढारी

परभणी : आयपीएस लोढांच्या बॉडीगार्डचीच दुचाकी चोरट्यांनी पळवली

गंगाखेड ; पुढारी वृत्तसेवा : परभणी पोलीस मुख्यालयात कार्यरत तथा प्रतिनियुक्ती वर गंगाखेड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आयपीएस पोलीस उपअधीक्षक श्रेणिक लोढा यांचे बॉडीगार्ड असलेले पोलीस कर्मचारी हनुमंत रमेश पौळ यांची दुचाकी चोरट्यांनी चोरल्याची घटना उघडकीस आली. गुन्हेगारीचा कर्दनकाळ म्हणून ओळखल्या जाणारे आयपीएस श्रेणिक लोढा यांच्या बॉडीगार्डची दुचाकी चोरट्यांनी पळविण्याची धमक दाखविल्याने पोलीस यंत्रणा या प्रकरणाचा तपास कशी करते याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

याबाबतची माहिती अशी की, येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात आयपीएस सैनिक लोढा यांचे बॉडीगार्ड असलेले पोलीस कर्मचारी हनुमंत रमेश पोळ यांनी शनिवारी गंगाखेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, दि.7 जुलै रोजी आपली होंडा मोटरसायकल (एमएच 24 बीडी 1954) पोलीस उपविभागीय कार्यालय गंगाखेड येथे लावून हँडल लॉक करून उपविभागीय अधिकारी यांच्यासोबत रात्रीची ड्युटी करत असताना फिर्यादी हे ड्युटी संपल्यानंतर कार्यालयात आले असता मोटरसायकल दिसून आली नाही. दरम्यान याप्रकरणी पोलीस कर्मचारी हनुमंत पवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याने हँडल लॉक तोडून मोटरसायकल चोरून नेल्याची तक्रार गंगाखेड पोलीस ठाण्यात दिल्यावर अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे प्रमुख सुनील माने हे करीत आहेत.

दरम्यान, शहरात मागील अनेक महिन्यात दुचाकी चोरीच्या प्रमाणात मोठ्या संख्येने वाढ झालेली असताना गुन्हेगारीचे कर्दनकाळ ठरत असलेले दस्तुरखुद्द आयपीएस श्रेणिक लोढा यांच्याच बॉडीगार्डची दुचाकी आता थेट प्रशासकीय कार्यालयातूनच चोरी गेल्याने या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने करते याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button