डोंबिवली : बँकेच्या कर्मचाऱ्यानेच खातेदारांच्या खात्यातून काढले ३ कोटी | पुढारी

डोंबिवली : बँकेच्या कर्मचाऱ्यानेच खातेदारांच्या खात्यातून काढले ३ कोटी

डोंबिवली: पुढारी वृत्तसेवा: आयसीआयसीआय बँकेत रिलेशनशीप मॅनेजर पदावर असणाऱ्या एका कर्मचाऱ्याने त्याच्या इतर साथीदारांसह बँकेतील अनेक खातेदारांच्या खात्यामधून ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी घेऊन पैसे उकळल्याची घटना डोंबिवली पूर्व येथे घडली आहे. या कर्मचाऱ्याने साथीदाराच्या मदतीने ३ कोटी ५७ लाख ४९ हजार १४१ रुपयांचा बँकेला गंडा घातला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आशिष याखमी हा डोंबिवली पूर्व येथील ममता हॉस्पिटल जवळील आयसीआयसीआय या बँकेत रिलेशनशिप मॅनेजर या पदावर काम करत होता. साधारण डिसेंबर २०१९ पासून ते १ फेब्रुवारी २०२१ पर्यंत त्यांनी अनेकांच्या खोट्या सह्या करून पैसे काढणे तसेच ग्राहकांची परवानगी नसताना आयसीआयसीआय प्रोडेन्सूअलची पॉलिसी काढणे, आदी गोष्टी केल्या.

विशेष म्हणजे हे सगळे व्यवहार करण्यासाठी तो मित्राच्या आणि स्वतःच्या वडिलांच्या खात्याचा वापर करत असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात आयसीआयसीआय बँकेचे क्षेत्रीय प्रमुख पवन माळवी यांनी तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास मानपाडा पोलीस करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button