मडगावात नाराज काँग्रेस आमदारांसोबत प्रदेशाध्यक्षांची चर्चा निष्फळ | पुढारी

मडगावात नाराज काँग्रेस आमदारांसोबत प्रदेशाध्यक्षांची चर्चा निष्फळ

मडगाव; पुढारी वृत्तसेवा: मडगावात काँग्रेसच्या आमदारांची धावपळ सुरू झाली आहे. हॉटेलवर प्रदेशाध्यक्ष अमोल पाटकर यांच्यासोबतची चर्चा निष्फळ झाल्यानंतर आता बंडखोर आमदारांचा एक गट माजी मुख्यमंत्री आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या आके येथील राधेय बंगल्यावर दाखल झाला आहे. त्यामुळे कामत यांची मनधरणी करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

दिगंबर कामत यांनी एल्टन डिकॉस्ता यांच्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बैठकीला अनुपस्थिती लावली होती. सुमारे अर्धा तास चर्चा झाल्यानंतर हॉटेलमधून विरोधीपक्ष नेते मायकल लोबो, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर आणि गजानन तिळवे बाहेर पडले. ते एका खासगी इनोव्हा गाडीतून थेट दिगंबर कामत यांच्या राधे या बंगल्यावर दाखल झाले आहेत. पत्रकारांना बंगल्याबाहेर अडविण्यात आले आहे. अमित पाटकर हे सुमारे पंधरा मिनिटांनी राधे बंगल्यावर दाखल झाले. बराच वेळ त्यांच्यात चर्चा सुरू आहे. कामत यांनी प्रदेशाध्यक्ष पाटकर यांना ते कोणकोण येथील पर्तगाळ माठात गेल्याचे सांगितले होते. एकूण ७ आमदार या बैठकीला उपस्थित होते. पण मडगावात असूनसुद्धा ते या बैठकीला उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे दोन आमदारांसह अमित पाटकर त्यांना भेटण्यासाठी राधेय बंगल्यावर गेले आहेत. प्राप्त माहितीनुसार कामत यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button