पुढारी ऑनलाईन डेस्क :
पत्नीला काय कळतयं, असा विचार करत पतीने आपल्या प्रेयसीबरोबर मालदीव्ह ट्रीप ( Maldives Trip) केली. नेहमीप्रमाणे हा व्यभिचार खपून जाईल, अशा आनंदात तो होता. आपली 'खास' ट्रीपची माहिती पत्नीला मिळू नये म्हणून त्याचे पासपोर्टची पानेच फाडली. हीच चूक त्याला भलतीच महागात पडली. पासपोर्टची पाने फाडल्यामुळे पासपोर्ट प्राधिकरण आणि इमिग्रेशन विभागाशी फसवणूक केल्याप्रकरणी पती गजाआड केले त्याच्या या कारनाम्यामुळे मालदीव्ह ट्रीपही पत्नीसमाेर उघड झाली.
मुंबईतील एका खासगी कंपनीत अभियंता असणार्या तरुणाने आपल्या ऑफीस कामानिमित्त परदेशात जायचे आहे, अशी बतावणी पत्नीसमाेरकेली. त्याने ऑफीसमध्ये रजा घेवून प्रेयसीसोबत थेट मालदीव्हला गाठलं. प्रेयसीबरोबर 'जीवाची मालदीव्ह' केले. यानंतर तो घरी परतला.
ट्रीपच्या काळात पतीने व्हॉटसॲप कॉलच रिसीव्ह केला नव्हते. त्यामुळे पत्नीचाही संशय बळावला होता. मात्र तिला पतीच्या रंगेलपणाची माहिती नव्हती. गुरुवार ( दि.७ ) पती घरी परतला. मालदीव्ह ट्रीपची पत्नीला माहिती होवू नये यासाठी त्याने चक्क पासपोर्टवरील व्हिसाची शिक्के असलेली पानेच फाडून टाकली हाेती. ही बाब इमिग्रेशन अधिकार्याच्या निदर्शनास आली. त्याच्या पासपोर्टमधील ३ ते ६ आणि ३१ ते ३४ ही पाने फाडली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्याला विचारणा केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला फसवणूक आणि बोगसगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
आपली 'मालदीव्हला ट्रीप' गुप्त ठेवण्यासाठी पासपोर्टची पाने फाडल्याची कबुली त्याने दिली आहे. पासपोर्टची पाने फाडल्यामुळे पासपोर्ट प्राधिकरणा आणि इमिग्रेशन विभागाशी फसवणूक केल्याचा गुन्हा पतीविराेधात दाखल केला आहे. चौकशी त्याने आपली प्रेयसीबरोबरची मालदीव्ह ट्रीप उघड होवू नये म्हणून, पासपोर्टची पाने फाडल्याची कबुलीही त्याने दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा :