Payal Rohatgi Wedding : पायल रोहतगी अडकली लग्नबंधनात | पुढारी

Payal Rohatgi Wedding : पायल रोहतगी अडकली लग्नबंधनात

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी अखेर १२ वर्षाच्या डेटिंगनंतर लग्न बंधनात ( Payal Rohatgi Wedding ) अडकली आहे. पायलने कुस्तीपटू संग्राम सिंहसोबत लग्न केले आहे. पायल आणि संग्रामचा विवाह सोहळा आग्रा येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्याला काही जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींनी उपस्थिती लावली होती. या लग्नाचे काही फोटो पायलने स्वत: सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पायल रोहतगीने नुकतेच तिच्या इंन्स्टाग्रामवर तिच्या आणि संग्राम सिंहच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत हे कपल वधू-वरांच्या वेशभूषेत खूपच क्यूट दिसत आहे. विवाहवेळी पायलने लाल रंगाचा लेंहग्यासोबत भरजरी दागिने आणि मेकअप केलाय. तर यावेळी संग्राम बेज शेरवानी आणि मॅचिंग साफामध्ये खूपच हॅडसम दिसत होता. हिदू परंपरेनुसार दोघांचा विवाह आग्रा येथे पार पडला. या विवाहाला काही मोजकेच नातेवाईक आणि मित्रमंडळींनी आवर्जून उपस्थिती लावली आहे.

लग्नाच्या ( Payal Rohatgi Wedding ) एक दिवस आधी पायल आणि संग्रामने मंदिरातील पूजा केली आहे. याशिवाय दोघांच्या मेंहदी आणि हळदीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पायल आणि संग्राम गेल्या १२ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. लग्नानंतर लवकरच एका खास पार्टीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यासह बॉलिवूड स्टार्संनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय मेंहदी आणि हळदीच्या कार्यक्रमातील दोघांनी डान्स करतानाचे व्हिडिओदेखील व्हायरल झाले आहेत.

पायल आणि संग्रामची पहिली भेट २०११ मध्ये झाली होती. यानंतर २०१४ मध्ये दोघांनी साखरपुडा केला आहे. संग्रामसोबतच्या गेल्या १२ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर सध्या पायल विवाह बंधनात अडकली. पायलने २००२ मधील ‘ये क्या हो रहा है’ या चित्रपटातून पहिल्यादा पदापर्ण केले होते. यानंतर ती ‘३६ चायना टाऊन’ या चित्रपटात दिसली.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Team Payal Rohatgi (@payalrohatgi)

Back to top button