Zelensky : झेलेन्स्कींची भारताविरुद्ध करवाई, थेट राजदूतांनाच हटवले | पुढारी

Zelensky : झेलेन्स्कींची भारताविरुद्ध करवाई, थेट राजदूतांनाच हटवले

पुढारी ऑनलाईन डेस्क : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (volodymyr zelensky) यांनी शनिवारी कीव येथील भारतीय राजदूतांना हटवण्याची घोषणा केली. राष्ट्रपतींच्या अधिकृत वेबसाइटवरून ही माहिती देण्यात आली आहे. भारतासोबतच इतर अनेक देशांतील युक्रेनच्या राजदूतांना हटवण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या आदेशामागे कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. जर्मनी, झेक प्रजासत्ताक, नॉर्वे आणि हंगेरी येथील युक्रेनच्या राजदूतांना माघारी बोलवण्यात आले आहे. त्यांना नवी जबाबदारी देण्यात येणार जाणार की नाही हेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा भारताकडून उघडपणे विरोध करण्यात आलेला नाही. यात यादीत इतर अनेक देश आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत रशियाविरोधात मांडलेल्या ठरावावरील मतदानात भारताने भाग घेतला नव्हता.

रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन १३० हून अधिक दिवस झाले आहेत. मात्र रशियन सैन्य अद्याप युक्रेनचा ताबा घेऊ शकलेले नाही. रशियाने युक्रेनवर शनिवारी पुन्हा हल्ला केला. मारियुपोल व डोनेत्स्कसह अनेक शहरांवर रशियन विमानांनी बॉम्बहल्ले केले. डोनेत्स्कमध्ये झालेल्या हल्ल्यात ५ जणांचा बळी गेला असून, ७ जण जखमी झालेत. यासह सेंट्रल युक्रेनच्या २ शहरांतही १ जण ठार झाला असून, २ जण जखमी झालेत. युक्रेन देखील बाहेरून रशियन (Russian) सैन्याला रोखण्याचा प्रयत्न करत आहे, अशा आशयाचा एक व्हिडीओ लुहान्सकेचे गव्हर्नर सेर्ही हेदी यांच्याद्वारे सोशल मिडीयावर शेअर करण्यात आला आहे. (volodymyr zelensky)

Back to top button