मुंबईतील दहा टक्के पाणी कपात रद्द; मुंबईकरांना दिलासा | पुढारी

मुंबईतील दहा टक्के पाणी कपात रद्द; मुंबईकरांना दिलासा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन चार दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे शहरात लागू असलेली 10 टक्के पाणी कपात शुक्रवारपासून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या पंधरा-वीस दिवसापासून पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, तुळशी, विहार तलावात जूनमध्ये समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे शहरात दहा टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. त्यामुळे शहर व उपनगरातील अनेक नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र तलाव क्षेत्रात आता पाऊस दाखल झाला असून तलावातील पाणीसाठा ३ लाख ७५ हजार ५१४ दशलक्ष लिटरवर म्हणजे २५.९४ टक्के इतका झाला आहे. त्यामुळे शहरातील पाणी कपात रद्द करण्यात येत असल्याचे पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button