धनुष्यबाण शिवसेनेचा आहे अन् पुढेही राहील, विधानसभा निवडणूक घेण्याचे उद्धव ठाकरेंनी दिले आव्हान | पुढारी

धनुष्यबाण शिवसेनेचा आहे अन् पुढेही राहील, विधानसभा निवडणूक घेण्याचे उद्धव ठाकरेंनी दिले आव्हान

पुढारी ऑनलाईन डेस्क : धनुष्यबाण चिन्ह आपल्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. याबाबत चिंता करू नका, शिवसेना आणि धनुष्यबाण कोणीही वेगळा करू शकत नाही. त्यामुळे नवीन चिन्हाचा विचार करण्याची गरज नाही. धनुष्यबाण शिवसेनेचा आहे आणि राहील, आमदार जाऊ शकतात, परंतु पक्ष जात नसतो, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (दि.८) मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. विधीमंडळ पक्ष आणि रस्त्यावरील जनतेचा पक्ष यामध्ये फरक असतो, असेही ते यावेळी म्हणाले.

ठाकरे म्हणाले की, भावना आणि दु: ख मला ही आहे, परंतु मला शिवसैनिकांवरील ताण वाढवायचा नाही. साधी माणसं जो पर्यंत शिवसेनेसोबत आहेत, तोपर्यंत शिवसेनेला धोका नाही. आमच्यावर विकृत टीका कऱणाऱ्यावर बोलताना दातखिळी बसली होती का ? त्यावेळी गप्प का होता, असा सवाल त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना केला. त्रास देणाऱ्या सोबत सत्ता स्थापन केली. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला, मग तुमचे प्रेम खरं की खोटं, असे ते म्हणाले. आमदार पळून गेलं म्हणून पक्ष संपतो नसतो. विधीमंडळ पक्ष आणि रस्त्यावरील जनतेचा पक्ष यामध्ये फरक असतो, राज्यात मध्यावधी निवडणुका होऊ द्या, आमचे चुकले असेल, तर जनता दाखवून  देईल, असेही ते म्हणाले.

अडीच वर्षापूर्वी आम्ही ते म्हणत होतो. तसे झाले असते तर, आज आज सन्मानाने झाले असते, असे ही ते म्हणाले. शिवसेनेने साध्या माणसांना मोठं केले. शिवसेनेबाबत जे काही सुरू आहे. त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात निर्णय होईल. न्यायालयावर आपला पूर्ण विश्वास आहे, असे ते म्हणाले. राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार दौपद्री मुरमू यांना पाठिंबा देण्याबाबत शिवसेनेच्या सर्व खासदारांशी चर्चा केली जाईल. त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. राज्यातील गदारोळ संपल्यानंतर पंढरपूरला जाणार आहे. पंढरपूरला या, अशी विनंती वारकऱ्यांनी केली आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.

 उद्धव ठाकरे काय म्हणाले

अनेक दिवसांनी तुमचे मातोश्रीत स्वागत, सन्मानाने बोलावले, भविष्यात सुद्दा हीच अपेक्षा. एक दोन दिवसांनी आषाढी एकादशी. काही जण आज उद्याच दर्शन घेतील. मी नंतर जाऊन नक्कीच दर्शन घेईन. गेले ८-१० दिवस मातोश्रीला लोंढे. सगळ्यांच्या डोळ्यात अश्रु, शिवसेनाप्रमुखांचे एक वाक्य माशांच्या डोळ्यातले अश्रु कुणाला दिसत नाही. दडपण नाही हे सांगणे माझे काम. काही दिवस अगोदर मी कोरोना पाॅझिटीव्ह. मला कोविड नंतर जो त्रास झाला तो कुणालाही नाही झाला.

कायद्याच्या दृष्टीने धनुष्यबाण कुणी हिरावून घेऊ शकत नाही. पण नुसत धनुष्य बाण चिन्ह असलेल्या माणसाचा लोक मतदानात विचार करता. धनुष्यबाण कुणी दूर करु शकत नाही.
नगरसेवक गेले पण महापालिका अस्तित्वात नाही. गेले ते त्यांचे समर्थक. काल शिवसेना महिला जिल्हा प्रमुख त्यांच्या डोळ्या अश्रु होते. शिवसेनेने आजवर साध्या माणसाला मोठे केले ह्याचा अभिमान. यांच्यामुळे ज्यांना मोठेपण मिळाले ते गेले. साधी माणसं जोवर शिवसेने सोबत तोवर धोका नाही.

शेवटी रस्त्यावरचा पक्षाला मते देतात. कधीकाळी आमचा पण एकच आमदार वामनरावांची आठवण. आमदार जाऊ शकतात पक्ष नाही. तुम्ही भ्रमात जाऊ नका विधीमंडळ पक्ष वेगळा. धनुष्यबाण आपल्याकडेच राहील. जे सोबत राहिलेत त्यांचे जाहीर कौतुक. काही झाले तरी ते हटले नाहीत. अजूनही देशात असत्यमेव जयते नसून सत्यमेव जुयते आहे.

उद्याची याचिका देशातील लोकशाही किती मजबूत असणार आहे माननीय बाबासाहेबांच्या घटनेवर आहे की नाही लोकशाहीवर आहे की नाही यावर असणार आहे. कायदा घटनेप्रमाणे जे व्हायचे ते होईलच.

मातोश्रीने सन्माने बोलावले तर आम्ही जाऊ असे म्हणाले, त्यांना प्रेम आजही आहे त्यासाठी धन्यवाद. गेली काही वर्ष तुम्ही आज ज्यांच्याकडे गेलात ते ठाकरे कुटुंबियांच्या बद्दल बोलले. तुम्ही त्यांच्या मांडीवर बसलात. अश्या लोकांच्या सोबत तुम्ही स्वागत स्वीकारताहेत. हे जनतेला कळू द्या. आज अनेक मुद्दे आहेत पण मी सगळे बोलणार नाही. काही दिवसात सर्वांशी चर्चा करुन निर्णय घेईल. अनेक अनोळखी व्यक्ती सोबत पाठिंबा दर्शवताहेत. विधानसभेची निवडणुक घ्या. आम्ही चूक असू तर शिक्षा मिळेल. तेव्हा मुख्यमंत्री पद दिले असते तर हजारो कोटी खर्च करावे लागले नसते. माझ्याकडून वाद विवाद नको. अडीच वर्ष आपल्यावर टीका होत असतांना तुम्ही गप्प होतात. सगळ्यांना धन्यवाद

हेही वाचलंत का ? 

Back to top button