फडणवीस साहेब, तुम्ही एका दगडात किती पक्षी मारले? : बाळासाहेब थोरात | पुढारी

फडणवीस साहेब, तुम्ही एका दगडात किती पक्षी मारले? : बाळासाहेब थोरात

मुंबई, पुढारी ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेला सत्तासंघर्ष दररोज नवनवी वळणे घेताना दिसत आहे. शिवसेनेविरुद्ध बंड पुकारून मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेले एकनाथ शिंदे यांच्या सरकार आज विधासभेत पहिली अग्निपरीक्षा यशस्वीरित्या पार केली. रविवारी आणि सोमवार अशा दोन दिवसांसासाठी विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. आज विधानसभा अध्यक्षांची निवड केली गेली. यामध्ये १६४ मतांसह भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर हे अध्यक्षपदी निवडले गेले. राहुल नार्वेकर हे देशाच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत.

यावेळी सभागृहातील अनेक नेत्यांनी नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्षांचे अभिनंदन करताना भाषणे केली. यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटे काढले. थोरात म्हणाले की, अध्यक्ष राहुल नार्वेकर तुम्ही आदित्य ठाकरे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस सगळ्यांचेच खास आहात. पण काँग्रेसच्या जवळ का नाहीत ते कळत नाही? सगळ्यांना तुम्ही आपलेसे वाटणारे अध्यक्ष आहात. एकनाथ शिंदे शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले, त्यांचं कौतुक वाटतं, पण फडणवीसजी तुमचं कसं कौतुक करायचं हाच प्रश्न आम्हाला पडतो. त्यातच तुम्ही चांगले वक्ते असणारे राहुल नार्वेकर यांना विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करून तुम्ही एका दगडात किती पक्षी मारले? असा खरमरीत प्रश्नही थोरात यांनी यावेळी उपस्थित केला.

अजित पवारांची टोलेबाजी….

चंद्रकांतदादा, तुम्ही तर बाक वाजवू नका, तुमच्याच मंत्रिपदाचं काही खरं नाही

कुणी काहीही म्हणा, पण सगळ्यांच्याच मनात धाकधूक आहेच, भाजपच्या १०६ आमदारांनी स्वलतःलाच प्रश्न विचारावा हे काय झालं, चंद्रकांत दादा, तुम्ही तर बाक वाजवू नका, तुमच्याच मंत्रिपदाचं काही खरं नाही, शिंदेसाहेब तुम्ही फक्त माझ्या कानात सांगितलं असतं, तरी मी उद्धव ठाकरेंना सांगून आधीच तुम्हाला तिथं बसवलं असतं, आदित्य काही प्रॉब्लम आला नसता ना? असं म्हणत एकनाथ शिंदेंना अजित पवारांनी जोरदार टोला लगावला

मूळ भाजपातल्या लोकांचं मला वाईट वाटतंय

समोरच्या मंडळीत (सत्ताधारी बाकावर) आमच्याकडून गेलेलेच जास्त दिसतात, त्यांच्याकडे पाहून मूळ भाजपातल्या लोकांचं मला वाईट वाटतंय, पहिली रांग (उदय सामंत मूळ राष्ट्रवादीचे पहिल्या रांगेत बसलेले) पाहिली तरी तुमच्या लक्षात येईल, गणेश नाईक, बबनराव पाचपुते हे चेहरे पाहिले तरी तुम्हाला समजेल, दीपक केसरकर तर आता काय चांगला प्रवक्ता झालाय, त्यावेळी आम्ही शिकवलेलं कुठेही वाया गेलेलं नाही

भाजपात मूळचे लोक कमी, अजित पवारांची तुफान फटकेबाजी

“याआधी सत्ताधारी आणि आता विरोधी बाकावरुन पाहिलं तरी समोर मूळचे भाजपाचे मान्यवर कमी आणि आमच्याकडून गेलेलेच जास्तच पहायला मिळत आहेत. ते पाहून मूळच्या भाजपाच्या लोकांचं वाईट वाटतं.पहिली लाईन पाहिली तरी लक्षात येईल. दिपक केसरकर तर आता कसले प्रवक्ते झाले आहेत. आम्ही शिकवलेलं वाया गेलं नाही,” असा टोला अजित पवार यांनी लगावला.

राहुल नार्वेकर कुठेही गेले तरी पक्षाच्या नेतृत्वाला फार जवळ करतात

“राहुल नार्वेकर कुठेही गेले तरी पक्षाच्या नेतृत्वाला फार जवळ करतात. शिवसेनेत गेल्यानंतर आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीत मला आणि भाजपात गेल्यानंतर फडणवीसांना जवळ केले. आता एकनाथ शिंदे तुम्हीही जवळ करा, नाहीतर काही खरं नाही,” असं मिश्किल भाष्य अजित पवारांनी केलं.

Back to top button