लोकलमधून पडून दोघे ठार | पुढारी

लोकलमधून पडून दोघे ठार

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा :  लोकलमधून पडून दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कोपर ते दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान घडली. बुधवारी झालेल्या अपघातात एका वृद्धाचा, तर गुरुवारी झालेल्या अपघात एका तरुणाचा मृत्यू झाला. या दोन्ही अपघातांच्या नोंदी डोंबिवलीच्या लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी 29 तारखेला कोपर ते दिवा रेल्वे स्थानकादरम्यान अप-डाऊन रेल्वे मार्गालागत हा अपघात झाला. अपघातात मृत्यू पावलेल्या वृद्धाची ओळख पटली नसून रेल्वे पोलीस पुढील तपास करत आहेत. तर दुसर्‍या दिवशी गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोपर ते दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान डाऊन मार्गावर आणखी एक घटना घडली.

या अपघातात एक तरुण लोकलमधून पडून जागीच ठार झाला. या तरुणाचा उजव्या हातावर 3 स्टार आणि सूर्याचे चिन्ह गोंदले आहे. या तरुणाची कोणतीही माहिती मिळाल्यास हवा. सुनील पाटील यांच्याशी 8369638033 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button