शिवसेना आमदारांची आज हाेणार मातोश्रीवर बैठक | पुढारी

शिवसेना आमदारांची आज हाेणार मातोश्रीवर बैठक

मुंबई: पुढारी वृत्तसेवा
राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची तातडीची बैठक आज मातोश्रीवर बोलवली आहे. महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी अवघ्या एका दिवसाचा वेळ दिला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची बैठक बोलवली आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची सकाळी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीस शिवसेनेचा एकही नेता हजर नव्हता. त्यामुळे शिवसेना या बहुमत सिद्ध करण्याच्या ठरावावर काय भूमिका घेते, याकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीला सामोरे जावे असे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका आहे. तर विधानसभेत भाषण करून राजीनामा द्यावा, असे ठाकरे यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.

हेही वाचा :

Back to top button