राज्‍यपालांच्‍या आदेशाविराेधात सुनील प्रभू यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका | पुढारी

राज्‍यपालांच्‍या आदेशाविराेधात सुनील प्रभू यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी बहुमत चाचणी करण्याचे आदेश देताच शिवसेना विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

१६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असताना राज्यपालांनी बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत, ते अवैध आहेत. तसेच या बहुमत चाचणीसाठी केवळ एक दिवसाचा वेळ दिला आहे. हा वेळ अपुरा आहे. सर्व आमदारांना पोचण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात, असे प्रभू यांनी याचिकेत म्हटले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती शिवसेनेचे वकील मनू सिंघवी यांनी न्यायालयाकडे केली आहे. शिवसेनेच्या याचिकावर ५ वाजता सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयात यापूर्वी झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने १२ तारखेपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले होते.

होते. या काळात काही निर्णय झाला तर आम्हाला न्यायालयात येण्यास सांगितले आहे. त्यामुळे या याचिकेवर तत्काळ सुनावणी येऊन राज्यपालांच्या आदेश रद्द करावेत, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

Back to top button