गुवाहाटीमधील ‘त्‍या’ पोस्‍टरची महाराष्‍ट्रात चर्चा | पुढारी

गुवाहाटीमधील 'त्‍या' पोस्‍टरची महाराष्‍ट्रात चर्चा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
शिवसेनेतील बंड आणि महाविकास आघाडी सरकारचे भवितव्‍य, या दोन घडामोडींवर राज्‍यात जोरदार चर्चा सुरु आहे.
गेल्‍या आठ दिवसांपासून अधिक काळ शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचा गट गुवाहाटीमध्‍ये मुक्‍कामी आहे. या बंडाविरोधात शिवसैनिक विविध ठिकाणी रस्‍त्‍यावर उतरत आहेत. अनेक ठिकाणी तीव्र निषेध व्‍यक्‍त होत असतानाच आता गुवाहाटीमधील एका पोस्‍टरची चर्चा महाराष्‍ट्रात होवू लागली आहे.

गुवाहाटीत राष्‍ट्रवादी युवक काँग्रेसच्‍या पोस्‍टरची चर्चा

राष्‍ट्रवादी युवक काँग्रेसच्‍या वतीने गुवाहाटीत एक पोस्‍टर लावण्‍यात आले आहे. यामध्‍ये शिवसेनेच्‍या बंडखोर आमदारांचा तीव्र निषेध करण्‍यात आला आहे. यासाठी बाहुबली चित्रपटातील कटप्‍पाने बाहुबलीच्‍या पाठीत तलवार खुपसल्‍याचा फोटो वापरुन ‘सारा देश देख रहा है गुवाहाटी मै छुपे गद्दारों को माफ नही करेगी जनता, ऐसे फर्जी मक्‍कारों को’ असा म्‍हटलं आहे. आता गुवाहाटीमधील हे पोस्‍टर सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहे. याची चर्चा महाराष्‍ट्रात होवू लागली आहे.

कोणताही आमदार शिवसेनेच्या संपर्कात नाही : दीपक केसरकर

शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज (दि.२८) लाईव्ह संवाद साधताना शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांच्या विखारी टीकेवर बोट ठेवले. आम्हाला गद्दार म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असे सांगून गुवाहाटीतील कोणताही आमदार शिवसेनेच्या संपर्कात नाही, असा दावा केसरकर यांनी यावेळी केला. लवकरात लवकर महाराष्ट्रात परतणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या

ते म्हणाले की, संजय राऊत शिवसेनेला संपवायला निघाले आहेत. त्यांच्या विधानामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामधील संबंध बिघडत आहेत. पंतप्रधानांबद्दल जगभरात आदराचे स्थान आहे. जगभर पंतप्रधानांचे कौतुक होत आहे. परंतु शिवसेनेकडून त्यांच्यावर विखारी टीका होत आहे. हे बरोबर नाही. आम्ही भाजप शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून निवडून आलो आहोत. त्यामुळे आम्ही भाजपसमोर जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेला पाठिंबा म्हणून गुवाहाटीतील आमदार फोन स्वीकारत नाहीत. पण मुंबईतून येणारे फोन आदरापोटी घेत आहेत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा : 

 

Back to top button