धक्‍कादायक : म्हैसाळमधील वनमाेरे कुटुंबातील ९ जणांची आत्महत्या नसून हत्या; दोन अटकेत | पुढारी

धक्‍कादायक : म्हैसाळमधील वनमाेरे कुटुंबातील ९ जणांची आत्महत्या नसून हत्या; दोन अटकेत

मिरज, पुढारी वृत्तसेवा : म्हैसाळ येथील वनमाेरे कुटुंबातील ९ जणांची आत्महत्या केली नसून त्‍यांची हत्‍या झाल्‍याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन मांत्रिकांना अटक करण्यात करण्यात आल्‍याचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सांगितले.  आब्बास महमंदअली बागवान (वय 48, रा. मुस्लीम बाशा पेठ, मुलेगाव रोड, सोलापूर) आणि धीरज चंद्रकांत सुरवशे (वय 30, रा. वसंत विहर ध्यानेश्वरी, सोलापूर) अशी अटक केलेल्‍या आराेपींची नावे आहेत.

म्हैसाळ (ता. मिरज) येथे ९ जणांच्या आत्महत्येने खळबळ उडाली होती. ९ जणांनी आत्महत्या केल्याने पोलिसांनी तपास गतीने करण्यास सुरुवात केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी  चिठ्ठीमध्ये डॉ. माणिक वनमोरे आणि शिक्षक पोपट वनमोरे यांनी २५ जणांची नावे लिहिली होती. त्या दृष्टीने 25 पैकी १८ सावकारांना अटक करण्यात आली होती.

 मांत्रिकांनी जेवणातून विषारी द्रव्‍य घालून केले हत्‍याकांड : पाेलीस अधीक्षक गेडाम

 गुप्तधनाच्या हव्यासापोटी वनमोरे कुटुंबाचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज झाले होते. त्यामुळे पोलीस अंधश्रद्धेच्या दृष्टीने देखील तपास करीत होते. यावेळी दोन मांत्रिकांची नावे तपासात निष्पन्न झाली होती.  दोन मांत्रिक हे वारंवार वनमोरे कुटुंबीयांच्या घरी येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आब्बास बागवान आणि सुरवशे या दोघांना अटक केली आहे. वरील दोघांनी वनमोरे कुटुंबीयांना जेवणातून विषारी द्रव्य घालून हत्याकांड केले आहे. अशी माहिती पोलीस अधीक्षक गेडाम यांनी दिली.

हेही वाचलंत का?

Back to top button